Nirmala Sitharaman sakal
Personal Finance

Nirmala Sitharaman : फिनटेक कंपन्यांना नियमपालनाची सूचना ; केंद्रीय अर्थमंत्र्यांची ५० कंपन्यांच्या वरिष्ठांशी चर्चा

पेटीएम पेमेंट्स बँकेच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज फिनटेक कंपन्यांना भेडसावत असलेल्या नियामक समस्यांवर कंपन्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पेटीएम पेमेंट्स बँकेच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज फिनटेक कंपन्यांना भेडसावत असलेल्या नियामक समस्यांवर कंपन्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली. या बैठकीला रेझर पे, फोन पे, गुगल पे, ॲमेझॉन पे यासह खासगी क्षेत्रातील ५० फिनटेक कंपन्यांचे उच्च अधिकारी; तसेच ‘एनपीसीआय’चे अधिकारी, अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन, रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रवी शंकर उपस्थित होते.

या बैठकीसाठी ‘पेटीएम’च्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले नव्हते. यावेळी अर्थमंत्र्यांनी फिनटेक कंपन्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली. रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे फिनटेक उद्योगातील गैरप्रकार उजेडात आले आहेत.

रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेला नियमांचे पालन न केल्यामुळे २९ फेब्रुवारीनंतर ग्राहकांकडून कोणत्याही नव्या ठेवी किंवा टॉप अप स्वीकारण्यास प्रतिबंध केला, नंतर ही मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली. गेल्या आठवड्यात, रिझर्व्ह बँकेने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) पेटीएम पेमेंट्स बँकेमधून चार ते पाच इतर बँकांमध्ये ग्राहकांचे स्थलांतर करण्याची शक्यता तपासण्याचा सल्ला दिला. पेटीएम पेमेंट्स बँकेचे ३० कोटी वॉलेटधारक आणि तीन कोटी बँक ग्राहक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT