LIC mukesh ambani Sakal
Personal Finance

Reliance AGM 2023: मुकेश अंबानी LIC ला देणार टक्कर? जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची 'या' क्षेत्रात होणार एन्ट्री

Reliance AGM 2023: Jio Financial Services ही रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची नवीन कंपनी आहे.

राहुल शेळके

Reliance AGM 2023: रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी सांगितले की, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस विमा क्षेत्रात पाऊल टाकणार आहे. RIL च्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (RIL 46th AGM) संबोधित करताना, अंबानी म्हणाले की JFS आरोग्य विमा व्यवसायात पाऊल टाकेल. LIC ही विमा क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. आता मुकेश अंबानी LICला टक्कर देणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा आर्थिक सेवा व्यवसाय अलीकडेच विस्कळीत झाला आहे. Jio Financial Services ही रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची नवीन कंपनी आहे. कंपनीच्या वाढीच्या मार्गाबाबत अंबानी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या वर्गाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने या व्यवसायाची योजना आखण्यात आली आहे.

ते म्हणाले की, वित्तीय सेवा व्यवसायाचा विस्तार डिजिटल-फर्स्ट पध्दतीने केला जाईल. त्यांनी सांगितले की जेएफएसने ब्लॅकरॉकसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या भागीदारीतून मालमत्ता व्यवस्थापन कंपनी सुरू केली जाईल.

BlackRock ही जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी आहे जी 11 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त मालमत्तेचे व्यवस्थापन करते आणि या बाबतीत कंपनीची प्रतिष्ठा आणि ट्रॅक रेकॉर्ड उत्कृष्ट आहे.

रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण

रिलायन्स एजीएममध्ये मोठ्या घोषणांदरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL शेअर) च्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. रिलायन्सचा शेअर 0.25 टक्क्यांनी किरकोळ घसरून 2,463 रुपयांवर व्यवहार करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT