Reliance Industries most valuable Indian company Hurun Global 500 Sakal
Personal Finance

Hurun Global 500: रिलायन्स इंडस्ट्रीज देशात नंबर वन; अदानींच्या कंपन्या टॉप 500 यादीतून बाहेर

Hurun Global 500: रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या 2023 च्या हुरुन ग्लोबल 500 अहवालात ही माहिती देण्यात आली. या यादीमध्ये सरकारी नियंत्रणाखाली नसलेल्या जगातील 500 सर्वात मौल्यवान कंपन्यांचा समावेश आहे.

राहुल शेळके

Hurun Global 500: रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या 2023 च्या हुरुन ग्लोबल 500 अहवालात ही माहिती देण्यात आली. या यादीमध्ये सरकारी नियंत्रणाखाली नसलेल्या जगातील 500 सर्वात मौल्यवान कंपन्यांचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत समाविष्ट असलेल्या जगातील टॉप 40 कंपन्यांपैकी एकही भारतीय कंपनी नाही.

रिलायन्स इंडस्ट्रीज 198 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनासह 44व्या स्थानावर आहे. अहवालात म्हटले आहे की, रिलायन्स इंडस्ट्रीज, जी गेल्या वर्षी भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी होती, ती यावेळी यादीत 10 स्थानांनी घसरली आहे कारण कंपनीच्या एकूण मूल्यात 2 टक्क्यांनी घट झाली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या खालोखाल टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (60) आणि एचडीएफसी बँक (68) आहेत. वर्षभरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची एकूण मालमत्ता 14 टक्क्यांनी वाढून 158 अब्ज डॉलर झाली आहे. 2023 मध्ये तिच्या क्रमवारीत पाच स्थानांनी सुधारणा झाली आहे.

अहवालात म्हटले आहे की, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणामुळे, कंपनी यादीत 43 स्थानावरुन 68 व्या स्थानावर पोहोचली आहे. टायटन कंपनी आणि सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजनेही टॉप 500 कंपन्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. टायटनसह 90 नवीन स्टोअर्सचा विस्तार आणि इस्रायलमधील प्रमुख अधिग्रहणांमुळे सन फार्माने या यादीत स्थान मिळवले.

Binance आणि Activision Blizzard सारख्या 48 कंपन्या कमी मूल्यांकनामुळे या यादीतून बाहेर पडल्या होत्या. भारतात, अदानी समूहाच्या अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅस याही टॉप 500 कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडल्या.

जगातील पाच कंपन्यांनी एक ट्रिलियन डॉलर्सचे मूल्यांकन ओलांडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामध्ये Apple, Microsoft, Alphabet, Amazon आणि Nvidia यांचा समावेश आहे.

चॅट जीपीटीचा प्रभाव

मायक्रोसॉफ्ट (708 बिलियन डॉलर वाढ) आणि Nvidia (697 बिलियन डॉलर वाढ) या दोन कंपन्या होत्या ज्यांचे मूल्यांकन सर्वात जास्त वाढले आहे. दोन्ही कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर चॅट जीपीटीशी जोडलेल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने चॅट जीपीटीची मूळ कंपनी ओपन एआयमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT