SBI PC Jewellers Sakal
Personal Finance

SBI PC Jewellers: एसबीआयने पीसी ज्वेलर्सच्या दोन निवासी मालमत्ता घेतल्या ताब्यात; काय आहे कारण?

SBI PC Jewellers: पीसी ज्वेलर्सचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत तीन टक्क्यांनी घसरले आहेत

राहुल शेळके

SBI PC Jewellers: स्टेट बँक ऑफ इंडियाने PC ज्वेलर्सची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. पीसी ज्वेलर्स कंपनी आणि तिचे जामीनदार एसबीआयचे 1,169 कोटी रुपयांचे कर्ज फेडू शकले नाहीत त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

गुरुवारी ही बातमी समोर आल्यानंतर, PC ज्वेलर्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये सुमारे 1.39 टक्क्यांची घसरण झाली. पीसी ज्वेलर्सचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत तीन टक्क्यांनी घसरले आहेत, तर गेल्या एका महिन्यात चार टक्क्यांनी घसरले आहेत.

पीसी ज्वेलर्सच्या या मालमत्तेशी कोणताही व्यवहार न करण्याचा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे कारण बँकेला त्यातून 1,267 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाने इतर कर्जदारांच्या कर्जाची रक्कमही त्यात जोडली आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने यापूर्वीच पीसी ज्वेलर्सविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात खटला दाखल केला होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पीसी ज्वेलर्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत 3,466 कोटी रुपयांचे कर्ज चुकवल्याचे सांगितले होते.

पीसी ज्वेलर्सचा देशांतर्गत व्यवसाय 33 कोटी रुपयांवर घसरला आहे. गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत तो 836 कोटी रुपये होता. गेल्या काही काळापासून पीसी ज्वेलर्सच्या कामकाजात अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत पीसी ज्वेलर्सने 14 स्टोअर बंद केले आहेत आणि त्यासोबतच देशभरातील तीन फ्रँचायझी स्टोअर्सही बंद करावी लागली आहेत. आता कंपनीची 56 स्वतःची आणि सात फ्रँचायझी स्टोअर्स आहेत.

पीसी ज्वेलर्स आणि बँकांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे कंपनीला कामकाजात अडचणी येत आहेत. पीसी ज्वेलर्सने म्हटले आहे की, ते कर्ज देणाऱ्या बँकांशी न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याची शक्यता शोधत आहे आणि याबद्दल त्यांच्याशी नियमित चर्चा करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT