Indian startup Founder Rahul Yadav Sakal
Personal Finance

स्वत:ची हौस कर्मचाऱ्यांसाठी पाऊस... 7 महिने कर्मचाऱ्यांचा पगार थकवून मालकानं चैनीसाठी उडवले 280 कोटी

अनेक महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही.

राहुल शेळके

Indian startup Founder Rahul Yadav: गेल्या काही वर्षांपासून भारतात स्टार्टअप्सचे जाळे निर्माण झाले आहे. आजकाल बरेच लोक नोकरी करण्याऐवजी स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्यास प्राधान्य देत आहेत.

एकीकडे काही स्टार्टअप कंपन्या यशाचा नवा अध्याय लिहीत असताना दुसरीकडे काहींना प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. हाऊसिंग ब्रोकिंग क्षेत्रात काम करणारी कंपनी, ब्रोकर नेटवर्क ही जी बी नेटवर्कद्वारे चालवली जाते, ती आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

राहुल यादवच्या प्रॉपर्टी टेक स्टार्टअप 4B नेटवर्क्सचे एकूण 280 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एकीकडे कंपनीतील कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, तर दुसरीकडे कंपनीचे संस्थापक राहुल यादव हे अत्यंत विलासी जीवन जगत आहेत.

IANS च्या वृत्तानुसार, कंपनीचे मोठे नुकसान झाल्यानंतरही संस्थापक राहुल यादव अतिशय विलासी जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे मर्सिडीज-मेबॅकसारख्या आलिशान वाहने आहेत.

यासोबतच राहुल यादव ताज लँडमध्ये 80,000 रुपये प्रतिदिन भाड्याने एक आलिशान बोर्ड रूम घेतली आहे. धक्कादायक बाब म्हणजे राहुल या सर्व गोष्टींवर कोट्यवधींचा खर्च करत असताना कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार दिलेला नाही.

कर्मचाऱ्यांना सात महिन्यांपासून पगार नाही:

स्टार्टअप न्यूज पोर्टल Inc42 च्या बातमीनुसार, ब्रोकर नेटवर्कने केवळ 18 महिन्यांच्या कमी कालावधीत 280 कोटी रुपये खर्च केले आहेत. कंपनीने नोव्हेंबर 2022 पासून आपल्या 150 हून अधिक कर्मचार्‍यांना पगार दिलेला नाही.

राहुल यादव यांनी आपल्या जुन्या अधिकाऱ्यांना वैयक्तिक कर्ज घेऊन सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास सांगितले होते. या कामासाठी एका अधिकाऱ्याने 50 लाख रुपये कर्ज घेतले होते. बराच काळ पैसे परत न केल्यास या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने फौजदारी तक्रार दाखल केली.

कंपनीचे ऑडिट केले जाईल:

इन्फो एजने राहुल यादव यांच्या कंपनी 4B नेटवर्क्सचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. इन्फो एजने मागितलेली माहिती कंपनीने न दिल्याने कंपनीने सुमारे एक चतुर्थांश गुंतवणूक राइट ऑफ करण्याचा निर्णय घेतला होता.

इन्फो एजने शेअर बाजाराला सांगितले की त्यांनी 4B नेटवर्कला एकूण 288 कोटी रुपये दिले होते. यापैकी 276 कोटी रुपये शेअर्समध्ये गुंतवले गेले आहेत, तर 12 कोटी रुपये डेट फायनान्सिंग म्हणून देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT