Modi Sarkar To scrap Sovereign Gold Bond Scheme Esakal
Personal Finance

Sovereign Gold Bond योजना बंद होणार? गुंतवणूकदारांचे 85 हजार कोटी सरकारकडे, 'हे' कारण ठरतेय डोकेदुखी

Sovereign Gold Bond Scheme: खरेतर, 2015 ते 2017 दरम्यान जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बाँड्सच्या पहिल्या चार हप्त्यांमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे दुप्पट झाले आहेत.

आशुतोष मसगौंडे

देशातील सोन्याच्या वाढत्या आयातीला आळा घालण्यासाठी सरकार सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) योजना बंद करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारला वाटत आहे की, की हे एक महागडे आणि गुंतागुंतीचे गुंतवणूक साधन आहे. या कारणास्तव सरकार यापुढे सॉवरेन गोल्ड बाँड जारी करणार नाही. मात्र ही योजना बंद करण्याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

याबाबतच्या उलटसुलट चर्चा आधीच सुरू झाल्या असून, बाजार या निर्णयासाठी जवळजवळ तयार दिसत आहे. दुय्यम बाजारात सॉवरेन गोल्ड बाँडची मागणी वाढली आहे. सरकारने 2015 मध्ये कागदी सोन्याच्या स्वरूपात सॉवरेन गोल्ड बाँड सादर केले होते. आरबीआय त्याचे व्यवस्थापन करते.

सरकार SGB योजनेद्वारे बाजारापेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करण्याचा पर्याय देते. त्याची मॅच्युरिटी कालावधी आठ वर्षे आहे. याव्यतिरिक्त, खरेदीदारांना 2.5 टक्के परतावा देखील मिळतो.

ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 67 हप्ते जारी करण्यात आले आहेत, ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी 72,274 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यातील चार हप्ते पूर्णतः मॅच्युर झाले आहेत.

ही योजना 2015 मध्ये सादर करण्यात आली, जेव्हा तिची इश्यू किंमत 2,684 रुपये प्रति ग्रॅम होती. त्याची मॅच्युरिटी 2023 मध्ये पूर्ण झाली, जेव्हा रिडम्पशन किंमत 6,132 रुपये निश्चित करण्यात आली होती. अशाप्रकारे आठ वर्षांत गुंतवणूकदारांना 2.28 पट नफा झाला.

खरेतर, 2015 ते 2017 दरम्यान जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बाँड्सच्या पहिल्या चार हप्त्यांमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवलेले पैसे दुप्पट झाले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना त्यांच्याच खिशातून सरकारला परतावा द्यावा लागतो.

2024-25 च्या अर्थसंकल्पीय दस्तऐवजात असे नमूद केले आहे की या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना सरकारचे एकूण 85,000 कोटी रुपयांचे दायित्व आहे. मार्च 2020 अखेर 10,000 कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण 8.5 पट जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Prediction: सोनं आणखी 30 टक्के वाढणार; पुढच्या दिवाळीपर्यंत किती होणार भाव? अ‍ॅक्सिसने वर्तवला अंदाज

Indian Postal Service: 'अमेरिकेसाठी पोस्टाची भारतीय टपाल सेवा सुरू'; दोन महिने सेवा होती बंद; नव्या सीमाशुल्कानुसार सेवा

Latest Marathi News Live Update : पनवेल महानगरपालिकची “स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी” मोहीम

अमीषा पटेलला ज्याच्यासोबत 'वन नाईट स्टँड' करायचं होतं त्याचं झालं ब्रेकअप, आता अभिनेता चौथ्या लग्नाच्या तयारीत

Virat Kohli : मोठी अपडेट्स : विराटने 'Cryptic Post' लिहिली, BCCI ने २०२७ च्या वर्ल्ड कपमध्ये 'त्याच्या' खेळण्यावर निर्णय घेऊन टाकला

SCROLL FOR NEXT