Sahara Group threatens legal action over Scam 2010 web series controversy  Sakal
Personal Finance

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Sahara Group on 'Scam 2010 - The Subrata Roy Saga': सहारा समूहाने आगामी 'स्कॅम 2010 - द सुब्रत रॉय सागा' या वेब सिरीजवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याला “निंदनीय कृत्य” असे म्हटले आहे.

राहुल शेळके

Sahara Group on 'Scam 2010 - The Subrata Roy Saga': सहारा समूहाने आगामी 'स्कॅम 2010 - द सुब्रत रॉय सागा' या वेब सिरीजवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याला “निंदनीय कृत्य” असे म्हटले आहे. समूहाने म्हटले आहे की ते या शोच्या निर्मात्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे.

'स्कॅम 2010 - द सुब्रत रॉय सागा' हा हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम’ या मालिकेचा तिसरा भाग आहे. यापूर्वी 'स्कॅम 1992: द हर्षद मेहता स्टोरी' आणि 'स्कॅम 2003: द तेलगी स्टोरी' सोनी लिव्हवर प्रचंड यशस्वी झाले होते.

चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी गुरुवारी “स्कॅम 2010: द सुब्रत रॉय सागा” या वेब सीरिजची घोषणा केली. या घोषणेनंतर सहारा इंडियाने तीव्र आक्षेप घोतला आहे. सहारा समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की ते या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. निर्माता, दिग्दर्शक आणि मालिकेशी संबंधित सर्वांविरुद्ध कायदेशीर लढाई लढणार असल्याचे सहारा इंडियाने सांगितले.

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि कंपनी यांच्यात सुरू असलेला वाद अजूनही सर्वोच्च न्यायालयात असल्याची माहिती सहारा समूहाने दिली आहे. अशा कृतींना न्यायालयाचा अवमान आणि संभाव्य गुन्हा मानला जाऊ शकतो, असेही कंपनीने म्हटले आहे.

तमाल बंद्योपाध्याय यांच्या 'सहारा: द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकावर आधारित ही मालिका हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली ॲप्लॉज एंटरटेनमेंटच्या सहकार्याने स्टुडिओ नेक्स्ट निर्मित करणार आहे. चित्रपटाच्या निर्मिती टीमच्या मते, “स्कॅम 2010” हा भारतातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांपैकी एक आहे.

प्रॉडक्शन टीमने एका निवेदनात म्हटले आहे की, "2000 च्या दशकाच्या सुरुवातीस, सुब्रत रॉय यांच्यावर चिटफंड घोटाळ्यापासून ते बनावट गुंतवणूकदार होण्यापर्यंतचे विविध आरोप लावण्यात आले होते, ज्यामुळे शेवटी त्यांना 2014 मध्ये अटक करण्यात आली. "अंदाजे 25,000 कोटी रुपये अजूनही सरकारी अधिकाऱ्यांकडे दावा न करता पडून आहेत, याचा अर्थ घोटाळ्याचा परिणाम आजही जाणवू शकतो."

दुसरीकडे, सहारा समूहाचे म्हणणे आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ज्या व्यक्तीचा बचाव करता येत नाही, त्याची प्रतिमा डागळू दिली जाऊ नये. मालिकेच्या शीर्षकात 'स्कॅम' हा शब्द वापरल्याबद्दलही समूहाने टीका केली आहे.

“वेब सिरीजच्या शीर्षकामध्ये ‘स्कॅम’ या शब्दाचा वापर करणे आणि त्याचा सहाराशी संबंध जोडणे हे प्रथमदर्शनी मानहानीकारक असल्याचे दिसते आणि सहश्रीजी आणि सहारा इंडिया परिवाराची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब करते,” असे समूहाने म्हटले आहे.

काय होता सहारा स्कॅम?

दीर्घ आजाराशी झुंज दिल्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये सुब्रत रॉय यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कंपन्यांबाबत अनेक कायदेशीर आणि सरकारी तपासण्या झाल्या. रॉय यांच्या कंपन्यांवर पॉन्झी योजना चालवून नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता.

2011 मध्ये, SEBI ने सहारा ग्रुपच्या दोन कंपन्यांना - सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड (SIREL) आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (SHICL) यांना सुमारे 3 कोटी गुंतवणूकदारांकडून जमा केलेले पैसे परत करण्याचे निर्देश दिले होते.

हा पैसा ठराविक बॉण्ड्सच्या माध्यमातून उभा करण्यात आला होता, ज्यांना ऑप्शनली फुल्ली कन्व्हर्टेबल बाँड्स (OFCD) असे म्हणतात. या दोन्ही कंपन्यांनी हे रोखे विकून आपल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे सेबीने मान्य केले. या कारणास्तव सेबीने हा आदेश दिला.

अनेक अपील केल्यानंतर, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑगस्ट 2012 रोजी सेबीचा आदेश कायम ठेवला आणि या दोन कंपन्यांना 15 टक्के व्याजासह गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे निर्देश दिले.

सहारा समूहाने दावा केला की त्यांनी 95 टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदारांना पैसे परत केले आहेत, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही, गुंतवणूकदारांना पेमेंटसाठी अंदाजे 24,000 कोटी रुपये सेबीकडे जमा करण्यास सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT