RBI Governor Salary Sakal
Personal Finance

RBI Governor Salary: ज्यांच्या सहीशिवाय नोटा छापल्या जात नाहीत, त्या RBI गव्हर्नरचा किती आहे पगार?

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा पगार आणि अधिकार तुम्हाला माहीत आहेत का?

राहुल शेळके

RBI Governor Salary: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांना या नोटा बदलून घेण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.

2000 रुपयांच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर RBI खूप चर्चेत आहे. ज्यांच्या सहीशिवाय नोटा छापल्या जात नाहीत, ज्यांच्या निर्णयामुळे नोटा बंद होतात, त्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा पगार आणि अधिकार तुम्हाला माहीत आहेत का?

RBI गव्हर्नरचा पगार किती आहे?

RBI चे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास आहेत. गेल्या आर्थिक वर्षात त्यांचे मासिक वेतन अडीच लाख रुपये होते. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, शक्तीकांत दास यांच्या आधी आरबीआयचे गव्हर्नर राहिलेले उर्जित पटेल यांनाही महिन्याला अडीच लाख रुपये पगार मिळत होता.

गव्हर्नरनंतर आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरला महिन्याला 2.25 लाख रुपये पगार मिळतो. आणि कार्यकारी संचालकांचा मासिक पगार 2.16 लाख रुपये आहे.

पगारासह काय सुविधा आहेत?

RBI गव्हर्नरला पगाराव्यतिरिक्त अनेक सुविधा मिळतात. त्यांना शासनाकडून घर, वाहने, चालक व इतर सुविधाही मिळतात. आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर शक्तीकांत दास यांची ही दुसरी टर्म आहे.

1980 च्या बॅचच्या IAS शक्तीकांता दास यांनी 2018 मध्ये पदभार स्वीकारला. 2021 मध्ये त्यांना तीन वर्षांची मुदतवाढ मिळाली.कोण आहे शक्तिकांता दास?

कोण आहेत शक्तिकांत दास?

आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास मूळचे ओडिशाचे आहेत. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1957 रोजी भुवनेश्वर, ओडिशा येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहासात एमए केले आहे. यानंतर ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले.

ते 1980 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. 2008 मध्ये, RBI चे गव्हर्नर होण्यापूर्वी त्यांना प्रथम अर्थ मंत्रालयात संयुक्त सचिव बनवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT