SEBI T+0 settlement System  Sakal
Personal Finance

SEBI: शेअर बाजारात T+0 सेटलमेंट अनिवार्य असणार का? सेबीच्या प्रमुखांनी दिलं स्पष्टीकरण

SEBI T+0 System: शेअर खरेदी आणि विक्रीसाठी T+0 सेटलमेंट अनिवार्य करण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही, असे सेबीने म्हटले आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी या प्रकरणी सेबीची भूमिका मांडली.

राहुल शेळके

SEBI T+0 System: शेअर खरेदी आणि विक्रीसाठी T+0 सेटलमेंट अनिवार्य करण्यासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही, असे सेबीने म्हटले आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी या प्रकरणी सेबीची भूमिका मांडताना सांगितले की, सेबी बोर्डाने निवडक स्टॉक ब्रोकर्स ही सुविधा स्विकारतात का याची तपासणी करत आहे.

T+0 सेटलमेंट म्हणजे तुमचे शेअर्स खरेदी किंवा विक्रीची संपूर्ण प्रक्रिया त्याच दिवशी पूर्ण होते. तुम्ही ज्या दिवशी शेअर्स खरेदी करता त्याच दिवशी ते तुमच्या डिमॅट खात्यात हस्तांतरित केले जातील. त्याचप्रमाणे, तुम्ही शेअर्सची विक्री केली तर त्याच दिवशी तुम्हाला पेमेंट मिळेल.

Application Supported By Blocked Amount (ASBA) ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे किरकोळ गुंतवणूकदार IPO किंवा FPO मध्ये गुंतवणुकीसाठी अर्ज करतात आणि शेअर्सचे वाटप होईपर्यंत संबंधित रक्कम त्यांच्या बचत खात्यात ब्लॉक करतात.

तुम्हाला शेअर्सचे वाटप केले असल्यास ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून वजा केली जाते अन्यथा वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती अनब्लॉक केली जाते.

ASBA अनिवार्य होऊ शकते

प्राथमिक बाजारात ASBA अधिक लोकप्रिय आहे. यामध्ये IPO अर्जाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात ब्लॉक केली जाते. या वर्षाच्या सुरुवातीला सेबीने बाजारात व्यापारासाठी अशी सुविधा सुरू केली होती.

सध्या, ASBA बाजारपेठेतील ASBA ब्रोकरसाठी ऐच्छिक सुविधा आहे. SEBI ने आता असे म्हटले आहे की ASBA सेटलमेंट प्रणाली बाजारासाठी ऐच्छिक आधारावर सुरू करून काही काळ झाला आहे आणि ती चांगली काम करत आहे. सेबीने सांगितले की निवडक ब्रोकरेजसाठी ही सुविधा अनिवार्य करण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT