sebi sakal
Personal Finance

SEBI : आयपीओमधील गैरप्रकार रोखण्यासाठी ‘सेबी’ सज्ज

प्रारंभिक शेअर विक्री अर्थात ‘आयपीओ’मधील गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने ‘आयपीओ’साठी अर्ज करण्याच्या प्रकारांचा भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ तपास करत असून, दोषींवर कारवाई केली जाईल,

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : प्रारंभिक शेअर विक्री अर्थात ‘आयपीओ’मधील गैरप्रकार आणि चुकीच्या पद्धतीने ‘आयपीओ’साठी अर्ज करण्याच्या प्रकारांचा भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ तपास करत असून, दोषींवर कारवाई केली जाईल, असे ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी अलीकडेच ‘असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकर्स ऑफ इंडिया’च्या अधिवेशनात सांगितले.

सध्या यासंबंधी तीन प्रकरणांचा तपास सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.नव्या कंपन्यांच्या प्रारंभिक शेअर विक्री प्रक्रियेचे व्यवस्थापन हाताळणाऱ्या तीन मर्चंट बँकरकडून ‘आयपीओ’दरम्यान वारंवार कृत्रिमरीत्या मागणी फुगवली जात असल्याचे ‘सेबी’ला आढळून आले आहे. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत यावेळी बुच यांनी दिले.

त्रयस्थ व्यक्तीच्या कागदपत्रांचा वापर करून बनावट खाती उघडून त्याद्वारे ‘आयपीओ’साठी अर्ज केले जाण्याचे गैरप्रकार आढळले असून, त्यासंदर्भात पुरेशी माहिती आणि सप्रमाण पुरावेदेखील मिळाल्याचे बूच यांनी स्पष्ट केले. शेअर बाजारात सूक्ष्म, लघू आणि मध्यम श्रेणीतील अर्थात एसएमई कंपन्यांच्या नोंदणीसाठी वेगळा मंच आहे.

त्याची नोंदणी प्रक्रियादेखील वेगळी आहे. छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान होऊ नये म्हणून अधिक जोखीम घेऊ इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी या मंचावर विशेष तरतूद आहे. याआधी देखील ‘सेबी’ने एसएमई मंचावर नोंदणीबद्ध होणाऱ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात होणारा गैरप्रकार आणि हेराफेरी रोखण्यासाठी विशेष देखरेखीची तरतूद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT