Share Market Top Shares eSakal
Personal Finance

Share Market Top Shares : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील ऍक्शनमध्ये?

थोड्या विरामानंतर गुरुवारी बाजार पुन्हा तेजीच्या दिशेने जाताना दिसल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले.

Sudesh

Top Shares in Focus Today : यूएस फेडरल रिझर्व्हच्या मवाळ भूमिकेमुळे गुरुवारी भारतीय शेअर बाजार चांगलाच वधारला. सेन्सेक्स 929 अंकांनी वाढून बंद झाला, तर निफ्टी 50 इंडेक्स 21200 च्या जवळ पोहोचला. निफ्टी आयटी आणि निफ्टी रिऍल्टी सारखे इंडेक्स या वाढीचे टॉप लीडर राहिले. यामध्ये अनुक्रमे 3.5 टक्के आणि 3.8 टक्के वाढ झाली आहे. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 929.60 अंकांनी अर्थात 1.34 टक्क्यांनी वाढून 70514.20 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 256.40 अंकांनी म्हणजेच 1.23 टक्क्यांनी वाढून 21,182.70 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सकारात्मक जागतिक संकेत पाहता, थोड्या विरामानंतर गुरुवारी बाजार पुन्हा तेजीच्या दिशेने जाताना दिसल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा यांनी सांगितले. मजबूत यूएस इंडेक्सेसचा प्रभाव भारतीय बाजारांवर कायम राहू शकतो आणि आता निफ्टी 21,500 वर आहे. बँकिंग आणि आयटी शेअर्सना प्राधान्य दिले पाहिजे असेही ते म्हणाले.

गुरुवारी इंडेक्स कंसोलिडेशन रेंजमधून बाहेर पडताना दिसत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रुपक डे म्हणाले. बाजारातील भावना मजबूत आहे. निफ्टी सर्व महत्त्वाच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर राहिला आहे. निफ्टीला 21,000 वर मजबूत सपोर्ट दिसत आहे. निफ्टी 21,400 च्या पुढे जाताना आपण लवकरच पाहू शकतो.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • इन्फोसिस (INFY)

  • टेक महिन्द्रा (TECHM)

  • एलटी माइंडट्री लिमिटेड (LTIM)

  • विप्रो (WIPRO)

  • एचसीएल टेक (HCLTECH)

  • एमफॅसिस (MPHASIS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • कोफोर्ज (COFORGE)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ए यू बँक (AUBANK)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT