Share Market eSakal
Personal Finance

Share Market : शेअर बाजारात तेजीची लाट; दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी गाठले नवे सार्वकालिक उच्चांक

‘सेन्सेक्स’मध्ये शुक्रवारी दिवसभरात ९६९ अंशांची वाढ होऊन दिवसअखेर तो ७१,४८३ च्या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला.

सकाळ वृत्तसेवा

भारतीय शेअर बाजारातील तेजीचे तुफान शुक्रवारी देखील कायम राहिले आणि दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी नवे सार्वकालिक उच्चांक गाठले. ‘सेन्सेक्स’मध्ये शुक्रवारी दिवसभरात ९६९ अंशांची वाढ होऊन दिवसअखेर तो ७१,४८३ च्या विक्रमी उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात त्यात १,०९१ अंशांची वाढ होऊन, त्याने ७१,६०५ अंशांच्या पातळीलाही स्पर्श केला होता. ही त्याची सर्वकालीन इंट्रा-डे उच्च पातळी आहे.

‘निफ्टी’मध्ये २७३ अंशांची वाढ होऊन तो २१,४५६ अंशांच्या नव्या उच्चांकावर स्थिरावला. दिवसभरात, तो ३०९ अंशांनी वाढून २१,४९२ अंशांच्या विक्रमी शिखरावरही पोचला होता.

देशांतर्गत चांगले आर्थिक तपशील आणि अमेरिकेच्या व्याजदरवाढीबाबतची चिंता कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी जोरदार खरेदी केली. याशिवाय, परदेशी गुंतवणूकदारांनी आयटी, धातू क्षेत्रातील शेअरची खरेदी सुरू ठेवल्याने देशांतर्गत शेअरना मदत झाली. आज आयटी निर्देशांक दोन टक्क्यांनी वधारला, असे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियो आणि हाँगकाँग शेअर बाजार तेजीत होते, तर युरोपीय बाजारांमध्ये संमिश्र स्थिती होती. गुरुवारी अमेरिकन बाजार तेजीत बंद झाले. ‘बीएसई’वर एचसीएल टेक्नॉलॉजीज सर्वांत जास्त ५.५८ टक्क्यांनी वाढला. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, टेक महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी आणि विप्रो यांनी मोठी वाढ नोंदवली. याउलट नेस्ले, भारती एअरटेल, मारुती आणि आयटीसी या शेअरचे भाव घसरले.

रुपयाची २७ पैशांनी उसळी

परदेशी निधीचा सातत्यपूर्ण ओघ आणि देशांतर्गत शेअर बाजारातील विक्रमी तेजी यामुळे रुपयाने आज डॉलरच्या तुलनेत तब्बल २७ पैशांनी उसळी घेतली आणि तो ८३.०३ वर स्थिरावला. आंतरबँक परकी चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत ८३.३० वर उघडला. व्यवहारांना सुरुवात झाल्यावर तो ८३.३२ पर्यंत घसरला. मात्र नंतर त्यात वाढ झाली आणि त्याने ८२.९४ चा उच्चांकही नोंदवला. साप्ताहिक आधारावर रुपया ३७ पैशांनी वधारला आहे.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेने प्रमुख व्याजदर अपरिवर्तित ठेवून पुढील वर्षी दरकपातीचे संकेत दिले आहेत; तसेच शेअर बाजारातील परदेशी निधीचा ओघ आणि अमेरिकी अर्थव्यवस्थेत मागणी वाढण्याच्या अपेक्षेमुळे आयटी निर्देशांकाने मारलेली बाजी, यामुळे भारतीय बाजारातील तेजीचा कल अबाधित राहिला आहे.

- विनोद नायर, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indias Most Richest and Poorest CM: भारतातील सर्वात श्रीमंत अन् सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? ‘ADR’ रिपोर्टमधून झाले उघड!

Latest Marathi News Updates: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

Velhe News : स्मशानभूमी अभावी निगडे खुर्द गावातील नागरिकांचे हाल; भर पावसात मृतदेह नीट जळण्यासाठी ग्रामस्थांनी धरली ताडपत्री

Pune Traffic : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवाची खरेदी, शनिवारची सुटी आणि रस्त्यात आलेल्या मांडवांमुळे कोंडीत भर

Manchar News : मंचरजवळ गोरक्षनाथ टेकडीवर शनी अमावस्येला भाविकांची गर्दी; पहाटे चार पासून दर्शनासाठी रांगा

SCROLL FOR NEXT