Silver Price Sakal
Personal Finance

Silver Price: चांदीला येणार सोन्याचे दिवस! भाव एक लाख रुपयांच्या पुढे जाणार, काय आहे कारण?

Silver Price: लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात चांदीचे भाव रोज नवनवे विक्रम करत होते. या वेळी चांदीचा भाव एक लाखाच्या पुढे जाईल, असे वाटत असतानाच चांदीचे भाव खाली येऊ लागले. मात्र आता पुन्हा एकदा चांदीचा भाव मार्चपर्यंत एक लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता दिसत आहे.

राहुल शेळके

Silver Price: लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात चांदीच्या भावाचे रोज नवनवे विक्रम होत होते. या वेळी चांदीचा भाव एक लाखाच्या पुढे जाईल, असे वाटत असतानाच चांदीचे भाव खाली येऊ लागले. मात्र आता पुन्हा एकदा चांदीचा भाव मार्चपर्यंत एक लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता दिसत आहे. किंबहुना अलीकडेच चीनसह जगातील अनेक देशांमध्ये अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला होता. त्यामुळे चांदीच्या मागणीत घट होऊन चांदीचे भाव खाली येऊ लागले. पण आता परिस्थिती बदलत आहे.

चांदीचा भाव एक लाखाच्या पुढे जाईल

केडिया कमोडिटीजचे प्रमुख अजय केडिया म्हणाले की, चांदीची व्यावसायिक मागणी पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने येत्या महिन्यात धोरणात्मक व्याजदर कमी करण्याचे संकेत दिले आहेत.

यामुळे चांदीची व्यावसायिक मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. चीनमधून चांदीच्या व्यावसायिक मागणीत पुन्हा एकदा वाढ झाली, तर मार्च 2025 पर्यंत चांदीची किंमत 1.10 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. अल्पावधीत चांदीवरील परतावा सोन्यापेक्षा चांगला असू शकतो.

चांदीची मागणी का वाढत आहे?

भारतात आता महागाई नियंत्रणात येऊ लागली आहे. अन्नधान्य महागाई अजूनही उच्च आहे. याशिवाय सरकारने 2024-25 च्या अर्थसंकल्पात उत्पादनाला चालना देण्यावर भर दिला आहे. आगामी काळात देशांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर इत्यादींच्या उत्पादनाला चालना दिल्याने देशांतर्गत चांदीची व्यावसायिक मागणी वाढेल.

एवढेच नाही तर भारताच्या बजेटमध्ये मोबाईल फोन, सोलर पॅनल आणि बॅटरी स्वस्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. यामुळे जागतिक स्तरावर चांदीची व्यावसायिक मागणी वाढण्यास मदत होईल. सर्व इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो त्यामुळे आगामी काळात चांदीचे भाव वाढू शकतात.

त्यामुळे येत्या काही दिवसांत चांदीच्या भावात झपाट्याने वाढ होऊ शकते. 1 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव 87,100 रुपये प्रति किलो होता. तर कमोडिटी एक्सचेंज एमसीएक्सवर चांदीचा भाव 84,534 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT