गेल्या काही दिवसांमध्ये ‘एसआयपी’ला मत देणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये वेगाने वाढ होत आहे.  SAkal
Personal Finance

माझे मत ‘एसआयपी’ला!

गेल्या काही दिवसांमध्ये ‘एसआयपी’ला मत देणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये वेगाने वाढ होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

sip investment plan to make wealth financial freedom

- डॉ. वीरेंद्र ताटके

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मतदान करण्यापूर्वी नागरिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी त्याची सर्वंकष माहिती, कामगिरी जाणून घेतात. कारण आपल्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी योग्य उमेदवार निवडणे गरजेचे असते. हाच निकष गुंतवणुकीसाठीही लागू होतो.

आपली गुंतवणूक फलदायी व्हावी, यासाठी गुंतवणूक क्षेत्रातील वेगवेगळ्या उमेदवारांमधून योग्य उमेदवार निवडणे महत्त्वाचे असते. गुंतवणुकीची रक्कम, कालावधी, सुरक्षितता, महागाईपेक्षा अधिक परतावा आणि तरलता या मुद्द्यांवर काही उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत. त्यातून योग्य उमेदवाराला मत देण्यासाठी सर्वांची सविस्तर माहिती घेऊ.

मुदत ठेव ः गुंतवणुकीच्या रिंगणातील अतिशय ज्येष्ठ आणि लोकप्रिय असा हा उमेदवार आहे. सुरक्षितता आणि ठरलेल्या दराने परतावा ही याची बलस्थाने आहेत. मात्र, दीर्घकाळात महागाईच्या दरापेक्षा अधिक परतावा देण्यास हा उमेदवार अपयशी ठरला आहे; तसेच ठरावीक रकमेपेक्षा अधिक परताव्याच्या रकमेतून ‘टीडीएस’ होत असल्याने उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास हा उमेदवार अपयशी ठरला आहे.

सोने ः गुंतवणुकीच्या उमदेवारांमध्ये सर्वांत जुना आणि महिलावर्गामध्ये अतिशय लोकप्रिय असलेला हा उमदेवार वर्षानुवर्षे गुंतवणूकदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आला आहे. अत्यंत सुरक्षित गुंतवणूक, दीर्घकाळात बाजारभावात वाढ ही त्याची आश्वासने आहेत आणि त्याने कायमच त्यांची पूर्तता केली आहे.

असे असले, तरी चोरी होण्याची भीती, विक्रीवेळी सहन करावी लागणारी तूट या मुद्द्यांवर त्याची पंचाईत होते. त्या तुलनेत गोल्ड म्युच्युअल फंड, गोल्ड ईटीएफ, सॉव्हरिन गोल्ड बाँड हे तरुण उमेदवार नव्या पिढीतील गुंतवणूकदारांना भुरळ पाडत आहेत.

रिअल इस्टेट ः शहरी आणि निमशहरी भागात अतिशय दबदबा असलेला हा उमेदवार आहे. एका बाजूला वाढती लोकसंख्या आणि दुसऱ्या बाजूला मर्यादित उपलब्ध जमीन यांमुळे हा उमदेवार आपले प्राबल्य टिकवून आहे. मात्र, गुंतवणुकीची मोठी रक्कम, गृहकर्जावरील व्याज वजा जाता उरणारा अत्यल्प परतावा आणि देखभालीसाठी करावा लागणारा खर्च यामुळे केवळ बडे गुंतवणूकदार या उमेदवाराला मत देताना दिसतात.

विमा ः गुंतवणूक नावाच्या मतदारसंघात हा योग्य उमेदवार ठरत नाही. तरीदेखील काही जण याला गुंतवणुकीसाठी मत देतात आणि फसतात. सुजाण गुंतवणूकदार मात्र याचा ‘बाहेरून पाठिंबा’ घेऊन इतर गुंतवणूक पर्याय निवडतात. थोडक्यात, गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी याचे आशीर्वाद घेऊन आणि याच्या पाठिंब्यावर इतर उपलब्ध उमेदवारांमधून योग्य उमेदवार निवडणे सूज्ञपणाचे ठरते.

म्युच्युअल फंड ‘एसआयपी’ ः गुंतवणुकीच्या सर्व निकषांच्या आधारावर हा उमेदवार उत्तम ठरतो. यामध्ये गुंतवणुकीची किमान रक्कम कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला सहज शक्य आहे; तसेच यात गुंतवलेली रक्कम आपल्या गरजेप्रमाणे कधीही काढून घेता येते. प्राप्तिकराच्या नियमाचे पालन केल्यास मिळणाऱ्या फायद्यावर करबचत होते.

दीर्घकाळामध्ये यातील जोखीम अत्यंत कमी होते. शेअर बाजारासारख्या दिग्गज उमेदवाराच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला हा उमदेवार बाजारातील जोखीम कमी करून त्याचे फायदे देतो आणि त्याचमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आपलेसे करण्यात काही वर्षांत यशस्वी झाला आहे.

वर उल्लेख केलेल्या प्रत्येक उमेदवाराची वैयक्तिक कामगिरी चांगली आहे. गुंतवणुकीच्या एखाद्या निकषावर उमेदवार इतरांच्या तुलनेत सरस आहे. मात्र, गुंतवणुकीच्या सर्व निकषांचा एकत्रित विचार केल्यास आपले गुंतवणुकीचे मत ‘एसआयपी’ला द्यावेसे वाटते.

‘एसआयपी’साठी भरघोस मतदान

गेल्या काही दिवसांमध्ये ‘एसआयपी’ला मत देणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये वेगाने वाढ होत आहे. एप्रिल महिन्यात ‘एसआयपी’द्वारे २०,००० कोटी रुपये एवढी प्रचंड रक्कम गुंतवणूकदारांनी गुंतवली. म्युच्युअल फंडाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा एक विक्रम आहे. देशातील म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनेखालील एकूण मालमत्ता (एयूएम) एप्रिलमध्ये सात टक्क्यांनी वाढून ती ५७.२६ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

Rupali Chakankar: तर लैंगिक छळाची घटना टळली असती; रूपाली चाकणकर, २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल का घेतली नाही?

SCROLL FOR NEXT