Saving Scheme
Saving Scheme Sakal
Personal Finance

Saving Scheme: खुशखबर! सरकारी बचत योजनांवर मिळणार जास्त व्याज, जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

राहुल शेळके

Saving Scheme: सरकारने सध्याच्या योजनांमध्ये काही बदल करून नव्या योजना सुरू केल्याने 1 एप्रिलपासून अल्पबचत योजनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आम्ही तुम्हाला अशा 3 योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्या 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहेत. आम्ही तुम्हाला ज्या योजना सांगणार आहोत त्या सर्व लहान बचत योजना पोस्ट ऑफिसशी जोडलेल्या आहेत.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र :

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना छोटी बचत योजना आहे जी मार्च 2025 पर्यंत दोन वर्षांसाठी उपलब्ध असणर आहे. या योजनेंतर्गत, वार्षिक 7.5 टक्के व्याजदराने दोन वर्षांच्या कालावधीसाठी 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. (Small savings schemes' interest rates for April-June quarter hiked Details here)

ज्येष्ठ नागरिक बचत योजना :

1 एप्रिलपासून, गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSS) 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतील. बजेटमध्ये ही मर्यादा 15 लाख रुपयांवरून वाढवण्यात आली. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या SCSS खात्यात अधिक पैसे जमा करता येतील आणि त्यांच्या बचतीवर अधिक व्याजदर मिळतील.

मासिक उत्पन्न योजना (MIS) :

MIS साठी ठेव मर्यादा 1 एप्रिलपासून प्रति व्यक्ती 4.5 लाख रुपये वरून 9 लाख रुपये केली जाईल, ज्यामुळे व्यक्तींना त्यांच्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल. संयुक्त खातेदारांसाठी ही मर्यादा 15 लाख रुपये करण्यात आली आहे. एमआयएस ही पोस्ट विभाग (DoP) द्वारे त्यांच्या ठेवीदारांना निश्चित मासिक उत्पन्न असलेली बचत योजना आहे.

एप्रिल-जून 2023 या तिमाहीसाठी सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरात 70 बेसिस पॉइंट्स (BPS) ने वाढ केली आहे. वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ज्येष्ठ नागरिक योजना, मासिक उत्पन्न योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या योजनांचे व्याजदर वाढवण्यात आले आहेत.

गेल्या 9 महिन्यांत केंद्र सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याची ही तिसरी वेळ आहे. सध्या लहान बचत योजनांचे व्याजदर 4.0 टक्के ते 8.2 टक्के दरम्यान आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT