sovereign gold bond scheme Buy 1 gram of gold and earn 2.50 percent interest Dhanteras 2023  Sakal
Personal Finance

Gold Investment: 1 ग्रॅम सोने खरेदी करा अन् 2.50 टक्के व्याज मिळवा; काय आहे मोदी सरकारची योजना?

Gold Investment: गेल्या काही वर्षांत डिजिटल सोन्याची मागणी वाढली आहे.

राहुल शेळके

Gold Investment: पुढील आठवड्यात धनत्रयोदशीचा सण आहे. या प्रसंगी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. बहुतेक लोक या दिवशी भौतिक सोने खरेदी करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत डिजिटल सोन्याची मागणी वाढली आहे.

तुम्ही डिजिटल पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करून सरकारकडून व्याजही मिळवू शकता. यासाठी एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) किंवा सार्वभौम गोल्ड बाँड (एसजीबी) इत्यादीद्वारे सोने खरेदी करता येते. Sovereign Gold Bond या योजनेत गुंतवणुकीवर तुम्हाला सोन्याची शुद्धता तर मिळेलच पण सरकारकडून व्याजही मिळेल.

सार्वभौम गोल्ड बाँड म्हणजे काय?

केंद्र सरकारने 2015 मध्ये सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली होती. केंद्र सरकार वेळोवेळी सर्वसामान्यांना या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी देते. या अंतर्गत तुम्ही एक ग्रॅम ते 4 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता. त्याची किंमत रिझर्व्ह बँक ठरवते.

साधारणपणे या सोन्याची किंमत सर्वसामान्य बाजारापेक्षा स्वस्त असते. डिजीटल पद्धतीने पेमेंट केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅमची सूटही मिळते. हे सोने बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), NSE आणि BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून खरेदी केले जाऊ शकते.

हे रोखे आठ वर्षांच्या कालावधीसाठी आहेत. म्हणजे मॅच्युरिटी आठ वर्षांच्या कालावधीत येते. 5व्या, 6व्या आणि 7व्या वर्षांत बाहेर पडण्याचे पर्यायही यात उपलब्ध आहेत. सरकारने गुंतवणुकीवर 2.50 टक्के वार्षिक व्याज निश्चित केले आहे.

सार्वभौम सुवर्ण रोख्यात तुम्हाला सोन्याच्या शुद्धतेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण जेव्हा तुम्ही ते खरेदी करता तेव्हा तुम्हाला डिजिटल पावती मिळेल, त्यामुळे ते विकताना त्याची शुद्धता तपासावी लागणार नाही. त्याचबरोबर सोन्याचे दागिने खरेदी करताना शुद्धतेबाबत अनेक अडचणी निर्माण होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT