sovereign gold bond eSakal
Personal Finance

SGB Price : गुंतवणुकीची 'सुवर्ण'संधी! 18 डिसेंबरपासून इश्यू होणार सॉवरेन गोल्ड बाँड; किंमतही झाली निश्चित

Sovereign gold bond upcoming issue : आरबीआयकडून जारी करण्यात येणारा हा 66वा सॉवरेन गोल्ड बाँड इश्यू असणार आहे.

Sudesh

Sovereign gold bond upcoming issue Price : तुम्ही जर सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर एक मोठी संधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) सॉवरेन गोल्ड बाँडची किंमत निश्चित केली आहे. 18 तारखेपासून हे बाँड इश्यू होण्यास सुरुवात होईल, आणि पुढील पाच दिवस हे इश्यू ओपन राहतील.

किती आहे किंमत?

आरबीआयने या बाँडमध्ये सोन्याचा दर (SGB rates) निश्चित केला आहे. यामध्ये 6,199 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने विकत घेता येईल. तसंच, गोल्ड बाँड ऑनलाईन खरेदी केल्यास 50 रुपये प्रति ग्रॅम सूट मिळणार आहे. ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांना हा डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतल्याचं अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं. यामुळे ऑनलाईन गुंतवणूकदारांना 6,149 रुपये प्रति ग्रॅम दराने सोनं खरेदी करता येणार आहे.

66 वा सॉवरेन गोल्ड बाँड

आरबीआयकडून जारी करण्यात येणारा हा 66वा सॉवरेन गोल्ड बाँड इश्यू असणार आहे. 2015 साली पहिला बाँड इश्यू करण्यात आला होता. हा गेल्या महिन्यात मॅच्युअर देखील झाला. एका बाँडचा मॅच्युरिटी पीरिएड हा आठ वर्षांचा असतो.

सॉवरेन गोल्ड बाँड हा सोन्यात गुंतणूक करण्याचा एक सुरक्षित पर्याय मानला जातो. यामध्ये एफडीच्या तुलनेत कित्येक पटींनी परतावा मिळतो. सरकारकडून जारी केले जात असल्यामुळे यात कोणतीही रिस्क नसते. तसंच गुंतवणूकदाराने जर मॅच्युरिटी काळापर्यंत सोनं विकलं नाही, तर त्यावेळी मिळणाऱ्या नफ्यावर कोणताही कर आकारला जात नाही.

अशी करा गुंतवणूक

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये तुम्ही एका वर्षात कमीत कमी एक ग्रॅम ते जास्तीत जास्त चार किलो सोनं खरेदी करू शकता. ट्रस्ट किंवा संस्थांसाठी ही मर्यादा 20 किलो आहे. सोनं खरेदी करण्यासाठी SHCIL, NSE, BSE, मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज, पोस्ट ऑफिस आणि कमर्शिअल बँकांमध्ये तुम्ही संपर्क साधू शकता. यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. सोबतच पॅन कार्ड असणंही अनिवार्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT