2000 Rupees Note RBI Sakal
Personal Finance

2000 Rupees Note: 2000च्या नोटा बदलायच्या आहेत.. ताण घेवु नका ग्रामीण भागात आहेत 'या' विशेष सुविधा

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला.

राहुल शेळके

2000 Rupees Note: 19 मे रोजी संध्याकाळी रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या नोटा कुठे आणि कशा बदलल्या जाणार आहेत.

आरबीआयने स्पष्ट केले आहे की 23 मे पासून प्रत्येक नागरिक देशातील कोणत्याही बँकेत जाऊन 2000 च्या नोटा बदलून घेऊ शकतो. परंतु देशातील दुर्गम भागात बँकांची सुविधा नाही, अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेने ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेष व्यवस्था केली आहे.

आरबीआयच्या या विशेष सुविधेमुळे गावकऱ्यांना 2000 च्या नोटा बदलून घेण्यासाठी शहरांमधील बँकांकडे जावे लागणार नाही. गावात राहून त्यांना या नोटा सहज बदलून मिळू शकतात. हे कसे शक्य होईल?

बँकेशिवाय बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरवरही 2000 च्या नोटा बदलता येतील. ही केंद्रे गावे आणि लहान शहरांमध्ये आहेत. तुम्ही खेड्यात राहत असाल तर तुम्ही बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरला भेट देऊन 2000 ची नोट सहज बदलू शकता.

रिझर्व्ह बँकेने 2000 च्या नोटा बदलून घेण्याबाबत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली आहे.

बिझनेस करस्पॉन्डंट सेंटर ही बँक शाखेची विस्तारित शाखा आहे जी खेडी आणि लहान शहरे यांसारख्या बँक नसलेल्या भागातील ग्राहकांना आर्थिक आणि बँकिंग सेवा देते.

2006 मध्ये, RBI ने बिगर बँक मध्यस्थ जसे की बिझनेस करस्पॉन्डंट सेंटर्स किंवा बिझनेस फॅसिलिटेटर्स वापरण्याची परवानगी दिली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की खातेदार एका दिवसात 4000 रुपयांच्या मर्यादेसह बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरद्वारे 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात. यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे.

RBI ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, बँकांनी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी विशेष व्यवस्था करावी. जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT