SpiceJet v/s Kalanithi Maran Arbitration Sakal
Personal Finance

SpiceJet: स्पाइसजेटला कोर्टाचा दणका, कलानिधी मारन यांना द्यावे लागणार 270 कोटी रुपये, काय आहे प्रकरण?

SpiceJet v/s Kalanithi Maran Arbitration: दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कलानिधी मारन यांना 270 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

राहुल शेळके

SpiceJet v/s Kalanithi Maran Arbitration: देशातील मोठी विमान कंपनी स्पाइसजेटला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मध्यस्थ न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवत एकल न्यायाधीशांच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी स्पाइसजेटची याचिका फेटाळून लावली.

ज्यामध्ये स्पाइसजेटला सन ग्रुपचे प्रवर्तक कलानिधी मारन यांना 270 कोटींहून अधिक रक्कम परत करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता कलानिधी मारन यांना 270 कोटी रुपये परत करावे लागणार आहेत.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा आणि न्यायमूर्ती धर्मेश शर्मा यांच्या खंडपीठाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या 13 फेब्रुवारी 2023 च्या निर्देशानुसार ते आदेशाला स्थगिती देऊ शकत नाही.

एकल न्यायाधीशांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना, दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आज अंतरिम दिलासा अर्ज फेटाळून लावला. जुलै 2018 मध्ये लवाद न्यायाधिकरणाने स्पाईसजेटला कलानिधी मारन यांना 270 कोटी परत करण्याचे आदेश दिले होते.

न्यायाधिकरणाने वॉरंटसाठी भरलेल्या रकमेवर वार्षिक 12% आणि मारन यांना वेळेत पैसे न दिल्याबद्दल वार्षिक 18% व्याज देण्याचे आदेशही न्यायाधिकरणाने दिले.

काय आहे प्रकरण?

मारन आणि स्पाइसजेटमधील वाद 2015 मध्ये सुरू झाला जेव्हा अजय सिंह यांनी मारनकडून स्पाइसजेट परत विकत घेतली. मारन यांनी 2015 मध्ये अजय सिंग यांना एअरलाइनमधील 58.46% हिस्सा दिला होता. करारानुसार, मारन यांना त्यांच्या विमान कंपनीचे प्रवर्तक असताना त्यांनी गुंतवलेल्या पैशाच्या बदल्यात रिडीम करण्यायोग्य वॉरंट मिळणार होते.

मारन हे 18 कोटी वॉरंट मिळविण्यासाठी जबाबदार होते, ज्याचा अर्थ स्पाइसजेटमधील 26% हिस्सा होता. पण मारन यांना ना त्यांच्या वाट्याचे पैसे मिळाले, ना परिवर्तनीय वॉरंट, ना प्रेफरन्स शेअर्स.

यामुळे संतापलेल्या मारन यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्यांनी हे प्रकरण लवादाकडे पाठवले. 1300 कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा दावा मारन यांनी केला. 2018 मध्ये, लवाद न्यायाधिकरणाने स्पाइसजेटला मारन यांना 270 कोटी परत करण्याचे आदेश दिले.

याव्यतिरिक्त, न्यायाधिकरणाने स्पाईसजेटला वॉरंटसाठी भरलेल्या रकमेवर वार्षिक 12% आणि निधी देण्यासाठी उशीर झाल्याबद्दल मारन यांना दिलेल्या रकमेवर वार्षिक 18% दराने व्याज देण्यास सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT