74 US CEOs fired in 2024 Sakal
Personal Finance

CEOs Layoff: अमेरिकेत आर्थिक मंदीचे संकेत? गेल्या 8 महिन्यांत 74 सीईओंना दाखवला बाहेरचा रस्ता

US Recession: मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, फेसबुक, ॲमेझॉन आणि गुगल सारख्या अमेरिकन कंपन्यांमध्ये 2022च्या अखेरीस मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू झाली. तेव्हाच आर्थिक मंदीची चाहूल लागली होती. अजूनही काही कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत

राहुल शेळके

US Recession: मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, फेसबुक, ॲमेझॉन आणि गुगल सारख्या अमेरिकन कंपन्यांमध्ये 2022च्या अखेरीस मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात सुरू झाली. तेव्हाच आर्थिक मंदीची चाहूल लागली होती.

अजूनही काही कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत आणि आता त्याचा फटका कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांनाही बसताना दिसत आहे. गेल्या 8 महिन्यांत सुमारे 74 सीईओंना कंपन्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सध्या स्टारबक्सने कंपनीच्या सीईओचा राजीनामा घेतला आहे.

स्टारबक्स कॉर्प, अमेरिकेतील सर्वात मोठ्या कॉफी कंपन्यांपैकी एक आहे, त्यांचे CEO लक्ष्मण नरसिंहन यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. कंपनीने याचे कोणतेही ठोस कारण दिलेले नाही, पण बातमी अशी आहे की कंपनीच्या विक्रीत गेल्या 2 तिमाहीत सातत्याने घसरण होत असून विक्री 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे लक्ष्मण नरसिंहन यांनी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

आर्थिक मंदीचा काय परिणाम होतो?

अमेरिका सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था अजूनही कोविडच्या धक्क्यातून पूर्णपणे सावरलेली नाही. महागाई आणि बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे.

अमेरिकेत मंदीची शक्यता वर्तवली जात आहे आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपातीची कोणतीही मोठी अपेक्षा नाही. याशिवाय अमेरिकेवरील कर्जाचा बोजा सातत्याने वाढत असल्याने परिस्थिती अधिक भयावह आहे. आता या वर्षी तेथे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकाही होणार आहेत.

या सर्व बाबींमुळे अमेरिकेची परिस्थिती खूपच विचित्र आहे. कंपन्यांनी कामगार, एचआर आणि इतर सामान्य व्यवस्थापन ते आर्थिक आणि विक्री विभागात कर्मचारी कपात केली आहे आणि आता ही परिस्थिती सीईओंच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. गेल्या महिन्यात आलेल्या अमेरिकेच्या रोजगार अहवालाने मंदीची भीती वाढवली आहे.

8 महिन्यांत 74 सीईओंचा राजीनामा

गेल्या 8 महिन्यांत 74 सीईओंनी राजीनामा दिला आहे. पण प्रकरण इथेच थांबत नाही. एक्सचेंज डॉट कॉमने यासंदर्भात संपूर्ण अहवाल तयार केला आहे. रसेल इंडेक्समधून वेगळे चित्र समोर आले आहे.

एक्सचेंज डॉट कॉमच्या अहवालात असे म्हटले आहे की रसेल 3000 इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या 191 सीईओंनी या वर्षी त्यांच्या कंपन्यांचा राजीनामा दिला आहे. यामध्ये सुमारे 74 जणांना बाहेर जावे लागले. Exchange.com 2017 पासून या संदर्भात डेटा ट्रॅक करत आहे.

अहवालानुसार, 2017 मध्ये 26 सीईओंना कंपनीतून काढून टाकण्यात आले. तर 2018 मध्ये 66, 2019 मध्ये 64, 2020 मध्ये 52, 2021 मध्ये 32, 2022 मध्ये 62, 2023 मध्ये 70 आणि 2024 मध्ये 74 CEO ची हकालपट्टी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is Rudali Tradition? : देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना 'रुदाली'ची उपमा; पण रुदाली म्हणजे कोण? काय आहे ही विचित्र परंपरा?

Thane News: शिवशाहीची धोकादायक अवस्था, व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग, अधिकाऱ्यांची सारवासारव

Adani Group Investment : दिवाळखोरीतून जाणाऱ्या ‘या’ कंपनीवर अदानी ग्रुप तब्बल १२५००००००००००० रुपये लावण्यास तयार!

Dhule News : धुळे जिल्हा बँकेचा 'कमाल': पीककर्ज वाटपात उद्दिष्ट ओलांडले, राष्ट्रीयीकृत बँका पिछाडीवर

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

SCROLL FOR NEXT