startup india sakal
Personal Finance

Startup : ‘स्टार्टअप’ रोजगारात महाराष्ट्र अव्वल; ३ वर्षांत देशात ६ लाख जणांच्या हाताला काम

तरुणांची पावले उद्योग, व्यवसायाकडे वळत आहेत. नवनवीन संकल्पनांना मूर्त स्वरूप देऊन तरुण स्वतःचे स्टार्टअप सुरू करीत असून, ते तरुणांना रोजगाराचे माध्यम बनत आहे.

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - तरुणांची पावले उद्योग, व्यवसायाकडे वळत आहेत. नवनवीन संकल्पनांना मूर्त स्वरूप देऊन तरुण स्वतःचे स्टार्टअप सुरू करीत असून, ते तरुणांना रोजगाराचे माध्यम बनत आहे.

वर्ष २०२० ते २०२२ या तीन वर्षांत देशात स्टार्टअपच्या माध्यमातून ६ लाख १५ हजार ३०९ रोजगार निर्मिती झाली. रोजगार दिलेल्या स्टार्टअपला केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अॅण्ड इंटर्नल ट्रेडने (डीपीआयआयटी) मान्यता दिलेली आहे.

या माध्यमातून रोजगार देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल असून, तीन वर्षांत १ लाख १८ हजार ६९८ जणांना स्टार्टअपमधून रोजगार मिळाला. स्टार्टअपमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी स्टार्टअप निधी कोश (एफएफएस) योजना आणि स्टार्टअप इंडिया फंड स्कीम (एसआईएसएफएस) कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे नवीन संकल्पना असलेल्या स्टार्टअपची संख्या दरवर्षी वाढत आहे.

स्टार्टअपमधून २०२० मध्ये देशात १ लाख ५१ हजार ८२६, वर्ष २०२१ मध्ये १ लाख ९५ हजार ५२७ तर २०२२ मध्ये २ लाख ६७ हजार ९५६ जणांना रोजगार मिळाला. स्टार्टअपमधून रोजगार देण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मागील तीन वर्षांत महाराष्ट्रात स्टार्टअपमधून १ लाख १८ हजार ६८९ रोजगार निर्मिती झाली आहे.

राज्यातील स्थिती

३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत देशात ‘डीपीआयआयटी’ने १ लाख १४ हजार ९०२ स्टार्टअपला मान्यता दिली. यातसुद्धा २० हजार ६९५ स्टार्टअपसह देशात महाराष्‍ट्र क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्रात वर्षनिहाय स्टार्टअपची संख्या वाढती आहे. त्या खालोखाल कर्नाटक, गुजरात राज्यांचा क्रमांक आहे. स्टार्टअप सुरू करण्यात सर्वाधिक संख्या तरुणांची असून, टायर टू सिटीमध्येही स्टार्टअपची संख्या वाढती आहे.

महाराष्ट्रात स्टार्टअपमधून मिळालेला रोजगार

  • २९,२११ - २०२०

  • ३८,५०४ - २०२१

  • ५०,९८३ - २०२२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT