Success Story Sakal
Personal Finance

Success Story: 'या' एका कारणावरून सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली लाखोंची नोकरी, आज आहे आध्यात्मिक गुरु

40 वर्षीय अमोघ लीला प्रभू इंजिनियरिंगची नोकरी सोडून आध्यात्मिक गुरु कसे झाले?

राहुल शेळके

Success Story: प्रेरणादायी वक्ते आणि कृष्णभक्त अमोघ लीला प्रभू हे नेहमीच त्यांच्या आध्यात्मिक संदेशामुळे आणि त्यांच्याशी संबंधित व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात.

अध्यात्म आणि भक्ती यासंबंधीचे त्यांचे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. पण तुम्हाला माहीत आहे का 40 वर्षीय अमोघ लीला प्रभू इंजिनियरिंगची नोकरी सोडून आध्यात्मिक गुरु कसे झाले?

2010 मध्ये संसाराचा त्याग करून भक्तीचा मार्ग स्वीकारला. चांगली नोकरी आणि आलिशान जीवनशैली सोडून त्यांनी भक्तीचा मार्ग कसा स्वीकारला? असा आहे अमोघ लीला प्रभू यांचा प्रवास.

अमोघ लीला प्रभू यांचे खरे नाव काय आहे?

दिल्लीतील द्वारका येथील इस्कॉन मंदिराचे उपाध्यक्ष, अमोघ लीला दास यांचे खरे नाव आशिष अरोरा आहे, ते एकेकाळी सॉफ्टवेअर इंजिनिअर होते पण नोकरी सोडून ते आध्यात्मिक गुरु झाले.

2010 मध्ये, भगवान श्री कृष्णाच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन, आशिष अरोरा अमोघ लीला दास बनले आणि 13 वर्षांपासून ते आध्यात्मिक गुरु आहेत.

इंजिनिअरची नोकरी का सोडली?

अमोघ लीला दास म्हणजेच आशिष अरोरा हे भक्तिमार्ग स्वीकारण्यापूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. चांगल्या पगाराची नोकरी सोडून ते आध्यात्मिक गुरु आणि ब्रह्मचारी का बनले?

हा प्रश्न अनेक प्रेक्षकांच्या आणि त्यांना फॉलो करणाऱ्या लोकांच्या मनात कायम आहे. याचे उत्तर खुद्द अमोघ लीला दास यांनी एका मुलाखतीत दिले.

अमोघ लीला दास यांनी सांगितले की त्यांनी 23 वर्षांपूर्वी म्हणजेच 2000 मध्ये भक्तीचा मार्ग निवडला होता आणि 2010 मध्ये ब्रह्मचर्य स्वीकारले होते. पूर्वी मला वाटायचे की मी खूप पैसे कमवले पाहिजे आणि गरिबांना मदत केली पाहिजे.

पण जेव्हा मी भगवद्गीता वाचली तेव्हा मला जाणवले की लोकांना शरीरापेक्षा मानसिक त्रास जास्त होतो. यानंतर मी लोकांची मानसिकता बदलण्याचा निर्णय घेतला आणि आध्यात्मिक गुरु झालो.

अमोघ लीला दास स्वतःला भगवान श्री कृष्णाचे पोस्टमन म्हणून संबोधतात आणि म्हणतात की मी गीतेची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवतो ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

अमोघ लीला प्रभू 40 वर्षांचे असले तरी त्यांच्यात 20 वर्षांच्या तरुणासारखी ऊर्जा आहे. त्याचे रहस्य म्हणजे त्यांचे साधे जीवन आणि खाण्याशी संबंधित नियम. ते रोज सकाळी फळे खातात आणि सात्विक आहार घेतात, असे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Warning: ''इराणसोबत सामंजस्य करार नाहीच, ते फक्त एक पत्र...'', पुन्हा हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ ४०० धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

Baba Vanga Prediction : निम्मा जून उलटूनही पाऊस नाही! 2026 बद्दल बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरतीये का? नेमकं काय म्हटले होते?

Latest Marathi News Live Update : तेलंगणा क्रिकेट असोसिएशनने चित्रपट अभिनेते विजय देवरकोंडा आणि व्यंकटेश, तसेच क्रिकेटपटू तिलक वर्मा, अंबाती रायडू आणि मोहम्मद सिराज यांना कायदेशीर नोटिसा बजावल्या

Panchwati Crime : सूटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून खून केल्याची माहिती

SCROLL FOR NEXT