UPI Payment sakal
Personal Finance

फिनटेक : ‘यूपीआय’च्या साह्याने काढा ‘एटीएम’मधून पैसे

सर्व जगात सध्या भारताच्या ‘यूपीआय’ सुविधेचा डंका वाजत आहे. या आधुनिक डिजिटल पेमेंट सुविधेमुळे भारताने घडविलेल्या परिवर्तनाचे कौतुक जागतिक बँकेने केले आहे.

सुधाकर कुलकर्णी

सर्व जगात सध्या भारताच्या ‘यूपीआय’ सुविधेचा डंका वाजत आहे. या आधुनिक डिजिटल पेमेंट सुविधेमुळे भारताने घडविलेल्या परिवर्तनाचे कौतुक जागतिक बँकेने केले आहे. देशात यंदाच्या ऑगस्ट महिन्यात ‘यूपीआय’चा वापर करून सुमारे १०५८ कोटी व्यवहार झाले आणि या सर्व व्यवहारांचे मूल्य १५.७६ लाख कोटी रुपये आहे.

या व्यवहारातील ही वाढ वार्षिक ६१ टक्के आहे, तर रुपयातील वाढ ४७ टक्के इतकी आहे. या ‘यूपीआय’ सुविधेतील आणखी एक पुढचे पाऊल नुकतेच टाकण्यात आले आहे. ते म्हणजे आता ‘एटीएम’मधून डेबिट किंवा ‘एटीएम’ कार्ड नसतानादेखील ‘यूपीआय’द्वारे रोख रक्कम काढता येणार आहे.

अशी आहे प्रक्रिया

‘यूपीआय’च्या साह्याने एटीएममधून पैसे काढण्याची सुविधाइतकी सुलभ आहे, की कोणीही अगदी सहजपणे त्याचा वापर करू शकेल. जे ग्राहक आपल्या मोबाईलवर भीम, गुगलपे, फोनपे यासारखे कोणतेही ‘यूपीआय’ वापरत असेल, तर ते ‘एटीएम’मधून रोख रक्कम काढू शकतील.

ही प्रक्रिया करताना प्रथम ‘एटीएम’वर ‘यूपीआय कार्डलेस कॅश’ हा पर्याय बघून त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर किती रक्कम काढावयाची आहे, याची विचारणा करणारा पर्याय समोर येईल. तेव्हा आपल्याला जितकी रक्कम काढावयाची आहे, तो आकडा टाकावा. त्यानंतर ‘एटीएम’ स्क्रीनवर एक ‘क्यूआर कोड’ येईल.

तो आपल्या मोबाईलमधील भीमपे किंवा गुगलपे किंवा फोनपेद्वारे स्कॅन करावा. त्यानंतर आपला ‘यूपीआय पिन’ मोबाईलमध्ये टाकावा. यानंतर ‘एटीएम’ ट्रेमध्ये आपल्याला हवी असलेली रोख रक्कम येईल. पैसे मिळतानाच आपल्या खात्यातून ती रक्कम वजा झाल्याचा ‘एसएमएस’ही येईल.

एकावेळी दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा आहे. युनियन बँक, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा या बँका सध्या ही सुविधा देत आहेत. लवकरच अन्य बँकासुद्धा ही सुविधा देऊ करतील.

फायदे कोणते?

‘यूपीआय-एटीएम’ सुविधेमुळे आता ग्राहकांना बाहेर जाताना डेबिट किंवा एटीएम कार्ड बरोबर नेण्याची गरज नाही. वेळप्रसंगी रोख पैशांची गरज भासल्यास आता कार्डाविना अडचण येणार नाही. ‘एटीएम’वर कार्डचा गैरवापर करून केली जाणारी फसवणूक टाळली जाईल. आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व सुरक्षित होतील.

नजीकच्या भविष्यात सर्वप्रकारची पेमेंट (ऑनलाइन/ऑफलाइन) आणि रोख पेमेंटसुद्धा ‘यूपीआय’द्वारे करता येणार असल्याने डेबिट कार्डाची गरजच उरणार नाही. ही सुविधा बिगर बँकिंग ‘एटीएम’मध्येसुद्धा मिळेल.

थोडक्यात, आपल्याला कधीही रोख रकमेची गरज भासली आणि कार्ड जवळ नसेल, तर जवळच्या ‘एटीएम’मधून रोख रक्कम काढून तातडीची गरज भागवू शकता.

बडोदा बँकेच्या सहा हजार ‘एटीएम’वर ही सुविधा

बँक ऑफ बडोदाच्या वतीने बँकेच्या देशभरातील सहा हजार‘एटीएम’वर ही ‘यूपीआय’च्या साह्याने रोख रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना डेबिट किंवा एटीएम कार्ड नसतानादेखील रोख रक्कम काढता येणार आहे. ही सुविधा अतिशय सुलभ आणि सुरक्षित असल्याचे बँकेने म्हटले आहे.

(लेखक सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT