Sumedh Battewar  esakal
Personal Finance

EMotorad: कौटुंबिक परंपरेला छेद देत बँकरच्या मुलाने उभारले ईव्ही साम्राज्य

Sumedh Battewar : सुमेध बट्टेवार यांना लहानपणापासूनच जाणीव होती की, आयुष्यात आपल्याला आकाशाला गवसणी घालायची आहे.

सकाळ वृत्तसेवा

सुमेध बट्टेवार यांना लहानपणापासूनच जाणीव होती की, आयुष्यात आपल्याला आकाशाला गवसणी घालायची आहे. स्वतःमध्ये असलेले नेटवर्किंगचे कौशल्य आणि लोकांशी पटकन जोडले जाण्याची क्षमता तरुणपणीच त्यांना लक्षात आली होती. 

त्याची आई एक शिक्षिका आहे, आणि त्याचे वडील एक मेहनती बँकर आहेत. तिन्ही बहिणी वैद्यकीय क्षेत्रात आहेत, परंतु त्याला आधीच माहित होते की हा मार्ग त्याला हवा होता.

कॉर्पोरेट सेल्स क्षेत्रात दशकभराचा अनुभव घेतल्यानंतर त्यांना धोरणात्मक बारकावे आणि व्यावसायिक  कौशल्य त्यांच्या अंगात मुरले होते. ते प्रख्यात ऑटोमोबाइल एजन्सीमध्ये कॉर्पोरेट सेल्सचे प्रमुख होते आणि एमोटरॅडच्या (EMotorad) जागतिक पातळीवरील निर्यातीमध्ये आणि विक्रीमध्ये त्यांना आपल्या कौशल्याचा उपयोग करण्यासाठी त्यांना या ज्ञानाचा उपयोग झाला.

 दूरदृष्टी, आव्हानांना सामोरे जात त्यावर मात करण्याची क्षमता आणि पुरवठा साखळीची सखोल समज यामुळे ते या क्षेत्रातील खरे उद्गाते आहेत. ईमोटरॅड आंतरराष्ट्रीय पातळीवर अग्रस्थानी आहेत आणि जगभरात आपल्या इलेक्ट्रिक सायकलींची निर्यात करत आहेत.

सुमेध जेव्हा अशा व्यवहारांची बोलणी करत नसतात, तेव्हा ते भटकंती करत असतात, स्तिमित करणारी ठिकाणे जाणून घेत असतात. ते स्वतः निसर्गप्रेमी आहेत आणि सतत शिकण्याची त्यांची वृत्ती आहे. यामुळे शाश्वत परिवहनाच्या क्षेत्राबद्दल त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोन विकसित झाला आहे. परिणामी, ते इमोटरॅडसाठी अभिनव कल्पना राबवू शकतात.

 जागतिक दृष्टीकोन असलेले सुमेध हे खऱ्या अर्थाने द्रष्टे असून आपली विनोदबुद्धी आणि 'करून दाखविण्याच्या' वृत्तीमुळे वाहतुकीचे भविष्य नव्याने घडवत आहेत. एकात्मिकता आणि समानुभूतीसह व्यवसाय करण्यावर त्यांची श्रद्धा आहे आणि ईमोटरॅड आणि त्यांचे जागतिक पातळीवरील भागीदार यांच्यात विश्वास व सहयोगाच्या संस्कृतीला ते चालना देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT