Yes Bank Founder Rana Kapoor's Bail Rejected In Money Laundering Case Sakal
Personal Finance

Supreme Court: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, जामीन अर्जावर विचार करण्यास दिला नकार

Supreme Court: राणा कपूर गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात आहे.

राहुल शेळके

Yes Bank Founder Rana Kapoor's Bail Rejected In Money Laundering Case: येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन अर्जावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. या प्रकरणाने संपूर्ण आर्थिक व्यवस्थेला हादरवून सोडल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राणा कपूर गेल्या तीन वर्षांपासून तुरुंगात आहे.

राणा कपूर यांच्यावर पदाचा दुरुपयोग करून कुटुंबातील सदस्यांना आणि सहकाऱ्यांना फायदा करून देण्याचा आरोप आहे. त्यांच्यावर लाचखोरी, भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगच्या कामात सहभाग असल्याचा आरोप आहे.

राणा कपूरविरुद्धचा गुन्हा सीबीआयने 2020 मध्ये पहिल्यांदा नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाने नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना 8 मार्च 2020 रोजी अटक करण्यात आली होती.

सेबीने नोटीस पाठवली आहे

सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर विचार करण्यास नकार दिल्यानंतर कपूर यांनी याचिका मागे घेतली आहे. या प्रकरणाने संपूर्ण आर्थिक यंत्रणा हादरली, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

येस बँकेकडून चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप केले. चुकीच्या पद्धतीने कर्ज घेण्यात कपूर कुटुंबाच्या शेल कंपन्यांचा मोठा वाटा होता.

येस बँकेने ज्या कंपन्यांना कर्ज दिले होते त्यात अनिल अंबानी ग्रुप, एस्सेल, दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन (DHFL), इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल (IL&FS) आणि व्होडाफोन सारख्या कंपन्यांचा समावेश आहे, ज्या आधीच कर्ज आणि तोट्यात आहेत.

येस बँकेवर कुटुंबाच्या सेल कंपन्यांच्या मदतीने चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप करून बँकेचे मोठे नुकसान केल्याचा आरोप आहे. राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काही कंपन्यांना येस बँकेकडून मोठे कर्ज मिळवून देण्यासाठी 4,300 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ईडीने केला आहे.

राणा कपूर चेअरमन असताना येस बँकेने 30,000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते, त्यापैकी 20,000 कोटी रुपये बुडीत कर्जात बदलले. ईडीने राणा कपूर यांच्यावर मोठ्या कॉर्पोरेट समूहांकडून स्वस्त कर्जाच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT