Supreme Court Sakal
Personal Finance

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाचा बँकांना दिलासा! फ्रॉड घोषित करण्यापूर्वी कर्जदारांचे म्हणणं...

तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात एसबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

राहुल शेळके

Supreme Court: 27 मार्चच्या निकालावर आपली भूमिका स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले की, बँकांना कर्जदाराचे खाते 'फसवणूक' म्हणून घोषित करण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकण्याचे निर्देश दिलेले नाहीत.

27 मार्चच्या आदेशात दोन मुद्यांवर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) वतीने न्यायालयाने हे स्पष्टीकरण दिले आहे.

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने सांगितले की, “कर्जदारांना वैयक्तिकरित्या बाजू मांडण्याची संधी दिली जावी, असे आम्ही कधीही म्हटले नाही. त्यांना योग्य सूचना देऊन बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे आम्ही म्हटले होते."

खंडपीठाने सांगितले की या टप्प्यावर, एसबीआयला या निर्णयाविरुद्ध पुनर्विलोकन याचिका दाखल करावी लागेल.

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 27 मार्च रोजी दिलेल्या आपल्या एका निकालात म्हटले होते की, "जर एखाद्ये खाते फसवणूक झाल्याचे घोषित केले गेले तर त्याची माहिती केवळ तपास यंत्रणांना दिली जाणार नाही, तर कर्जदाराला दंडात्मक आणि दिवाणी खटल्यांनाही सामोरे जावे लागेल."

SBI च्या याचिकेवर दिलेला निर्णय:

27 मार्च रोजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, खाती फसवणूक म्हणून घोषित केल्याने कर्जदारांच्या जीवनावर देखील विपरीत परिणाम होतो.

फसवणूक मार्गदर्शक तत्त्वांनुसार त्यांची खाती फसवणूक म्हणून वर्गीकृत करण्यापूर्वी बँकेने त्यांना त्यांचे मत मांडण्याची संधी दिली पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

RBI च्या 2016 च्या मास्टर सर्कुलरला 'वाणिज्यिक बँका आणि निवडक एफायएसकडून फसवणूक वर्गीकरण आणि रिपोर्टिंग' वर विविध उच्च न्यायालयांसमोर आव्हान देण्यात आले.

त्यात बँकांना मोठ्या कर्ज थकबाकीदारांपासून सावध राहण्यास सांगितले होते. आरबीआयने म्हटले होते की बँकांनी अशी खाती संशयास्पद आढळल्यास फ्रॉड म्हणून घोषित करावी.

तेलंगणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात एसबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेलंगणा उच्च न्यायालयाने 2020 मध्ये राजेश अग्रवाल यांच्या याचिकेवर निर्णय दिला होता की, कोणतेही खाते फसवणूक म्हणून घोषित करण्यापूर्वी खातेदाराला सुनावणीची संधी मिळावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT