Tata
Tata  Sakal
Personal Finance

Tata Consumer : टाटा-बिस्लेरी करार रद्द झाल्यानंतर टाटा समूहाने घेतला मोठा निर्णय; आता स्वतःच...

सकाळ डिजिटल टीम

Tata Consumer Products : बाटलीबंद पाण्याचा भारतातील सर्वात मोठा ब्रँड बिस्लेरी विकत घेण्याच्या प्रयत्नात टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स बराच काळ गुंतले होते. टाटांनी बिस्लेरी विकत घेण्यासाठी 7,000 कोटी रुपयांची बोली लावली होती, परंतु बिसलेरीचा सौदा काही कारणांमुळे होऊ शकला नाही.

यानंतर टाटांनी बाटलीबंद पाण्याचा ब्रँड बिस्लेरी खरेदी करण्याचा निर्णय सोडला आहे. आता टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने आपल्या मिनरल वॉटर ब्रँडमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाकडे टाटा कॉपर, टाटा ग्लुको आणि हिमालयन सारखे मिनरल वॉटरचे ब्रँड आहेत. असे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसोझा यांनी ही माहिती दिली आहे. डिसोझा म्हणाले, "बिसलेरी विकत घेतल्यानंतर आमची व्यवसाय वाढीची योजना 3 वर्षांनी पुढे गेली असती.

काही कारणास्तव, बिस्लेरी खरेदी करण्याचा निर्णय झाला नाही. आता आम्ही आमचे मिनरल वॉटर ब्रँड Tata Copper+, विकण्याचा विचार करत आहोत. टाटा ग्लुको+ आणि हिमालयन मिनरल वॉटरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून आम्ही आमचा व्यवसाय वाढवण्याची योजना आखत आहोत.''

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सने व्यवसाय वाढवण्यासाठी एकाच वेळी अनेक योजनांवर काम सुरू केले आहे. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स केवळ अन्न आणि पेये व्यवसाय करत नाही तर एफएमसीजी विभागातील इतर श्रेणींमध्येही मोठ्या गुंतवणुकीची योजना आखात आहे.

Tata Consumer Products ही अन्न आणि पेये व्यवसायातील एक मोठी कंपनी आहे. त्याचा 70% व्यवसाय भारतात आणि 30% परदेशात आहे.

बिस्लेरीने आपला व्यवसाय टाटा समूहाला देण्यास नकार दिला आहे. बिस्लेरीचे रमेश चौहान यांनी सांगितले होते की त्यांची मुलगी जयंती कंपनीची सूत्रे हाती घेईल, पण आता यातही नवा पेच आला आहे.

वृत्तानुसार, जयंती चौहान यांनी बिस्लेरीचा पदभार स्वीकारण्यास नकार दिला आहे. जयंतीचे वडील रमेश चौहान यांच्याशी मतभेद झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत, त्यामुळे चौहान यांनी बिसलेरी कंपनीच्या नवीन बॉसची घोषणा केली आहे.

जयंती आता अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील बिस्लेरी येथील व्यावसायिक व्यवस्थापन संघासोबत काम करणार आहे.

जयंती गेल्या अनेक वर्षांपासून बिस्लेरीच्या मिनरल वॉटरच्या व्यवसायाशी संबंधित आहे. बिस्लेरीच्या पोर्टफोलिओचा भाग असलेला वेदिका ब्रँड अलीकडच्या काळात त्यांचे लक्ष केंद्रीत करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT