Personal Finance

Tata Elxsi : 700 टक्के डिव्हिडंट अन् 2000 इंजिनिअर्सना नोकऱ्या; 'टाटा'च्या कंपनीचं चोख नियोजन

टाटा एलक्सीने मार्चमध्ये झालेल्या चौथ्या तिमाहीमध्ये १९६.९३ कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट कमावला आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेमध्ये २.२ टक्क्यांची घट झालेली आहे. टाटा एलक्सीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मागच्या आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत २०१.५१ कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला होता.

संतोष कानडे

Tata Elxi Quarterly Results : टाटाची सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी टाटा एलक्सीने आपल्या तिमाही निकालांमध्ये शेअरहोल्डर्ससाठी ७०० टक्के डिव्हिडंट देण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर कंपनीने २०२४-२५ या आर्थिक वर्षात साधारण दीड हजार ते दोन हजार इंजिनिर्सना नोकरी देण्याचं नियोजन केलं आहे.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, टाटा एलक्सीने आपल्या कॉन्फरन्स कॉलमध्ये मोठ्या भरतीची माहिती दिली आहे. टाटा एलक्सीने आपल्या भरती योजनेसंदर्भात सांगितलं की, आर्थिक वर्ष २०२५मध्ये साधारण १५०० ते २००० फ्रेशर्स इंजिनिर्सना कंपनी संधी देईल. कंपनीच्या गरजा आणि वेळांनुसार ही हायरिंग केली जाईल. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीने २ हजार १३५ जणांना जॉबची संधी दिली होती.

टाटा एलक्सीने मार्चमध्ये झालेल्या चौथ्या तिमाहीमध्ये १९६.९३ कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट कमावला आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेमध्ये २.२ टक्क्यांची घट झालेली आहे. टाटा एलक्सीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार कंपनीने मागच्या आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत २०१.५१ कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला होता.

दरम्यान, टाटा एलक्सीच्या शेअर्समध्ये बुधवारी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. ३८४.२० रुपये किंवा ५.२० टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. त्यामुळे शेअरची किंमत ७ हजार ११ रुपयांपर्यंत आली. वर्ष २०२३ मधल्या आपल्या सर्वकालीन उच्चांकावरुन टाटा एलेक्सीच्या शेअर्समध्ये २० टक्के घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT