Tech Industry Layoffs Sakal
Personal Finance

Layoffs 2024: जगभरात मंदीचे सावट! टेक कंपन्यांमध्ये 1 लाख कर्मचाऱ्यांची कपात; भारतात काय आहे स्थिती?

Tech Industry Layoffs: 2023 मध्ये सुरू झालेला टेक उद्योगातील कर्मचारी कपातीचा टप्पा संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 2024 मध्येही टेक उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरूच ठेवली आहे.

राहुल शेळके

Tech Industry Layoffs: 2023 मध्ये सुरू झालेला टेक उद्योगातील कर्मचारी कपातीचा टप्पा संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. 2024 मध्येही टेक उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात सुरूच ठेवली आहे. आता बहुतेक कंपन्या सायलेंट लेऑफद्वारे लोकांना घरी पाठवत आहेत.

या वर्षी जुलै अखेरपर्यंत सुमारे 1 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. जुलै महिन्यातच 34 टेक कंपन्यांनी सुमारे 8000 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. इंटेल आणि मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या कंपन्यांनीही नोकऱ्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे.

इंटेलने 15 हजार लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, 2024 मध्ये जगभरातील 384 कंपन्यांमधून 124,517 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. इंटेलने अलीकडेच 15 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या कामावरून कमी करण्याची घोषणा केली होती.

10 अब्ज डॉलर्सची बचत करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये 15 टक्के कपात करेल. कंपनीच्या महसुलात मोठी घट झाली आहे.

दुसरीकडे, मायक्रोसॉफ्टनेही गेल्या 2 महिन्यांत सुमारे 1000 लोकांना कामावरून काढून टाकले आहे. मात्र, कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

जगातील अनेक कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात केली जात आहे

सॉफ्टवेअर कंपनी UKG ने सुमारे 2200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कॅलिफोर्निया-आधारित वित्तीय व्यवस्थापन सॉफ्टवेअर कंपनी Intuit ने देखील 10 टक्के कर्मचारी कमी केले आहेत आणि सुमारे 1800 लोकांना घरी पाठवले आहे.

ब्रिटीश कंपनी डायसनने देखील वाढती स्पर्धा आणि पुनर्रचनेचे कारण देत 1000 लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे जगभरात 15 हजार कर्मचारी आहेत. दुसरीकडे, रशियन सायबर सुरक्षा कंपनी कॅस्परस्कीने अमेरिकेतील बंदीनंतर आपले कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय कंपन्यांमध्येही कर्मचारी कपात

भारतातील अनेक कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कर्मचारी कपात करण्यात आली आहे. यापैकी बेंगळुरू स्टार्टअप रेशामंडीने आपल्या 80 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. X चे प्रतिस्पर्धी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo ने देखील भारतात आपले कामकाज बंद केले आहे.

Unacademy ने 250 कर्मचारी, WayCool ने 200 कर्मचारी, PocketFM ने 200 कर्मचारी, Bungie ने 220 कर्मचारी आणि Humble Games ने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जगभरातील अस्थिरतेचा परिणाम भारतीय कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात भारतातील अनेक टेक कंपन्या कर्मचारी कपात करु शकतात. अगोदरच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT