Tesla Officials India Visit Sakal
Personal Finance

Elon Musk: टेस्ला होणार मेड इन इंडिया? इलॉन मस्क झुकला, अधिकाऱ्यांना पाठवणार मोदींच्या भेटीला

टेस्लाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत.

राहुल शेळके

Tesla Officials India Visit: इलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे अनेक वरिष्ठ अधिकारी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने आपल्या एका रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

देशात टेस्ला वाहनांचा पुरवठा वाढवणे हा या भेटीचा उद्देश आहे. टेस्ला अधिकार्‍यांची ही भारत भेट देखील खास आहे कारण टेस्ला कंपनी चीनला सोडून भारतासोबत आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताच्या उच्च आयात करांवर आणि इलेक्ट्रिक-वाहन धोरणांवर टीका केली होती. त्यामुळे ही भेट महत्त्वाची असणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टेस्ला एक्झिक्युटिव्ह्जमध्ये सी-सूट एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर यांचा समावेश असेल जे कंपनीच्या पुरवठा विभागाची देखरेख करतात. या अधिकार्‍यांच्या भारत भेटीचा उद्देश टेस्ला कारची देशात विक्री आणि वितरणा संबंधित चर्चा करणे हा आहे.

माहितीनुसार, टेस्ला अधिकाऱ्यांची भारत भेट अनेक अर्थांनी खास आहे. टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क आणि भारत यांच्यात आधीच वाद सुरू असताना कंपनीचे अधिकारी भारतात येत आहेत.

पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीला भारतात इलेक्ट्रिक वाहनांसाठी निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा घ्यायचा आहे. कारण भारत इलेक्ट्रिक  वाहनांच्या वापराला सतत प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे जीवाश्म इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी होत आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ सातत्याने वाढत आहे. भारतीयांची निवड पाहून अनेक परदेशी कंपन्यांनी इलेक्ट्रिक मार्केटमध्ये व्यवसायामध्ये उतरत आहेत.

यामध्ये BYD, MG, Kia, Hyundai, Mercedes, BMW, Audi, Volvo अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी भारतात एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने ऑफरमध्ये ठेवली आहेत.

गेल्या वर्षी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, जर टेस्ला भारतात आपली इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यास तयार असेल तर काही अडचण नाही परंतु कंपनीने चीनमधून कार आयात करू नये.

नितीन गडकरी रायसिना डायलॉगमध्ये म्हणाले होते की, भारतात विक्रेते उपलब्ध आहेत. आमच्याकडे सर्व प्रकारचे तंत्रज्ञान आहे, आमच्याकडे सर्व सुटे भाग आहेत. सरकारने कंपन्यांना इलेक्ट्रिक वाहनांवरील कस्टम ड्यूटी आणि करात मोठी सवलत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT