tesla power india will recruit more than 2000 employees know in which departments you will get jobs
tesla power india will recruit more than 2000 employees know in which departments you will get jobs Sakal
Personal Finance

Tesla Power India: टेस्ला पॉवर इंडिया 2,000हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार; कोणत्या क्षेत्रांमध्ये मिळणार नोकऱ्या?

राहुल शेळके

Tesla Power India Job: बॅटरी बनवणारी कंपनी टेस्ला पॉवर इंडिया विविध क्षेत्रांमध्ये 2,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखत आहे. कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की या भरती मोहिमेत अभियांत्रिकी, ऑपरेशन्स, विक्री आणि मार्केटिंग संबंधित पदांचा समावेश असेल.

यामुळे तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. कंपनी जुन्या बॅटरीज दुरुस्त करून त्यांची विक्री करण्यासाठी अलीकडेच त्याचा बॅटरी ब्रँड ‘रिस्टोर’ लाँच केला आहे. 2026 पर्यंत देशभरात 5,000 रिस्टोर ब्रँड स्टोअर्स उघडण्याची योजना आहे. (tesla power india will recruit more than 2000 employees know in which departments you will get jobs)

भारतातील व्यवसायाचा विस्तार

टेस्ला पॉवर इंडियाचे प्रशासकीय संचालक कविंदर खुराना म्हणाले, आम्ही भारतातील आमचा व्यवसाय विस्तारत असताना नवीन प्रयोग करुन आमची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करु. आम्ही आमच्या संस्थेमध्ये नवीन लोकांचे स्वागत करण्यास आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उत्सुक आहोत.

टेस्ला पॉवर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कविंदर खुराना यांनी मनीकंट्रोलला सांगितले की, “भारतातील शाश्वत ऊर्जा उपायांची वाढती मागणी पूर्ण करण्याच्या आमच्या निर्णयामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.

आमची क्षमता वाढवणे, नावीन्य आणणे आणि ऊर्जा क्षेत्रातील अग्रणी कंपनी म्हणून आमचे स्थान मजबूत करण्याचे आमचे ध्येय आहे. या नवीन नियुक्त्या आमच्या वाढीला चालना देण्यासाठी आणि भारताला शाश्वत ऊर्जा भविष्याकडे नेण्यात योगदान देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

ईव्हीच्या वाढत्या बाजारपेठेमुळे बॅटरीची मागणी वाढली

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार हळूहळू जोर धरत आहे. गेल्या वर्षी 15 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. टाटा समूह स्वतः बॅटरी व्यवसायात मोठी गुंतवणूक करत आहे. अशा परिस्थितीत बॅटरी उद्योगासाठी येणारा काळ चांगला असू शकतो. (demand for batteries increased due to the growing market of EVs)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT