Sukanya Samriddhi Yojana  Sakal
Personal Finance

Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफमध्ये अकाउंट असणाऱ्यांनी 31 मार्चआधी करा ही कामे...

मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपणार आहे. हा महिना 2023-2024 या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. नवीन आर्थिक वर्षाच्या आधी तुम्हाला काही काम पूर्ण करावी लागतील.

सकाळ वृत्तसेवा

Sukanya Samriddhi Yojana : मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपणार आहे. हा महिना 2023-2024 या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. नवीन आर्थिक वर्षाच्या आधी तुम्हाला काही काम पूर्ण करावी लागतील.

जर तुम्ही पब्लिक प्रॉविडंट फंड (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजनामसारख्या (SSY) स्कीम्समध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्यात किमान रक्कम 31 मार्चपर्यंत जमा करा, अन्यथा तुमचे खाते बंद (निष्क्रिय) होऊ शकते. तुम्ही बंद केलेले खाते नंतर पुन्हा उघडू शकत नाही असे नाही, पण यासाठी तुम्हाला अनावश्यक दंड भरावा लागेल.

पीपीएफमध्ये दरवर्षी किमान 500 रुपये आणि सुकन्या समृद्धी योजनेत किमान 250 रुपये जमा करावे लागतील. किमान रक्कम जमा न केल्यास तुमचे खाते बंद केले जाते. जर ही खाती बंद झाली असतील, तर ती पुन्हा उघडण्यासाठी, किमान रक्कम (पीपीएफसाठी 500 रुपये आणि सुकन्यासाठी 250 रुपये) आणि 50 रूपये डिफॉल्ट फी दरवर्षी जमा करावी लागेल.

तुम्ही जर दोन वर्ष पैसे जमा केले नाहीत, तर तुम्हाला दोन वर्षांसाठी 100 रुपये दंड आणि दोन वर्षांच्या किमान शिल्लक रकमेच्या आधारे 50 रुपये दंड भरावा लागेल. एवढेच नाही तर, पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी खाती बंद झाल्यास, तुम्ही त्यामधून आंशिक पैसे काढू शकणार नाही किंवा पीपीएफवर कर्ज सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही.

पब्लिक प्रॉविडंट फंडमध्ये जमा केलेल्या रकमेवर 7.1% व्याज दिले जात आहे आणि सुकन्या समृद्धी खात्यावर 8.2% व्याज दिले जात आहे. पीपीएफ योजनेत, रिटर्न, मॅच्युरिटी रक्कम आणि व्याज या तिन्हींवर आयकर सूट मिळते.

15 वर्षांसाठी खाती उघडली जाऊ शकतात, जी 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवली जाऊ शकतात. तर आयकर कायदा 80C अंतर्गत सुकन्या समृद्धी खात्यामध्ये कर लाभ मिळू शकतो. ही दोन्ही खाती पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या अधिकृत शाखेत उघडता येतात. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलीच्या जन्मानंतर तिचे वय 10 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी उघडले जाऊ शकते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT