Titan Company plans to hire over 3,000 employees in next 5 years  Sakal
Personal Finance

Tata Group: टाटा समूहाचा मोठा निर्णय! पुढील 5 वर्षांत 3,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार

Tata Group: कंपनीच्या निर्णयानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ

राहुल शेळके

Tata Group: टाटा समूहाची टायटन कंपनी पुढील पाच वर्षांत 3000 हून अधिक लोकांना नोकरी देण्याचा विचार करत आहे. कंपनीने आज 21 नोव्हेंबर रोजी ही माहिती दिली. कंपनी तनिष्क, मिया, फास्ट्रॅक, सोनाटा, iPlus, तनेरा, स्किन आणि कॅरेटलेन ब्रँड्समध्ये भारतीय आणि परदेशातील बाजारपेठांमध्ये आपला पोर्टफोलिओ वाढवण्याचा विचार करत आहे.

कंपनीने सांगितले की, अभियांत्रिकी, डिझाइन, लक्झरी, डिजिटल, डेटा अॅनालिटिक्स, मार्केटिंग आणि विक्रीसह इतर क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची योजना आहे. कंपनी सायबर सुरक्षा, उत्पादन व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग आणि इतर कौशल्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.

नावीन्य आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याचा कंपनीचा विचार आहे. कंपनी अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांची टक्केवारी पुढील 2-3 वर्षांत 50 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. सध्या कंपनीचे 60 टक्के कर्मचारी महानगरांमध्ये आणि 40 टक्के टियर II आणि III शहरांमध्ये आहेत

टायटन कंपनीच्या मानव संसाधन प्रमुख प्रिया मथिलकथ पिल्लई म्हणाल्या, “आम्ही पुढील पाच वर्षात 1,00,000 कोटींचा व्यवसाय करण्याचा विचार करत आहोत. आम्ही पुढील पाच वर्षात 3,000 नवीन लोकांना कामावर घेणार आहोत"

टायटन ही फॅशन अॅक्सेसरीज आणि ज्वेलरी रिटेलमध्ये काम करणारी प्रसिद्ध कंपनी आहे. टायटन आपला व्यवसायाचा देशभर विस्तार करत आहे. कंपनीची देशात 2160 हून अधिक स्टोअर्स आहेत. टायटन घड्याळे, परफ्यूम, सनग्लासेस आणि इतर फॅशन अॅक्सेसरीजचा किरकोळ व्यवसाय कंपनी करते.

कंपनीच्या निर्णयानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ

टाटा समूहाची कंपनी टायटनने मंगळवारी एक नवा टप्पा गाठला आहे. 3 ट्रिलियन मार्केट कॅपिटलायझेशन (मार्केट कॅप) क्लबमध्ये सामील होणारी ही टाटा समूहाची दुसरी कंपनी ठरली आहे.

कंपनीच्या शेअर्सने मंगळवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये बीएसईवर सुमारे 2 टक्क्यांच्या वाढीसह 3,400 रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. टाटा समूहाची दुसरी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आहे. ही कंपनी 12.95 लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह दुसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Amravati Crime : अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; पीडितेला दारू पाजल्याचाही आरोप, दोघांना अटक

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SCROLL FOR NEXT