Adani Electricity Sakal
Personal Finance

Adani Electricity : अदानी इलेक्ट्रिसिटीचे ईव्हीसाठी शेअर चार्जर; गृहनिर्माण संस्थांसाठी चार्जिंग उपक्रम

इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सहजपणे करता यावे, यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने गृहनिर्माण संस्थांसाठी शेअर चार्जिंग उपक्रम सुरू केला आहे. यात उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावले जातील.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग सहजपणे करता यावे, यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीने गृहनिर्माण संस्थांसाठी शेअर चार्जिंग उपक्रम सुरू केला आहे. यात उपनगरांमधील चार हजार सोसायट्यांमध्ये साडेआठ हजार चार्जर लावले जातील.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत असताना वाहनमालकांना चार्जिंगची व्यवस्था सहजपणे मिळावी, यासाठी अदाणी इलेक्ट्रिसिटीचा हा उपक्रम असून त्यामुळे सहजपणे स्वस्तात आणि पर्यावरणपूरक अशी चार्जिंग यंत्रणा नागरिकांना मिळू शकेल. या पद्धतीत वेगवेगळ्या चार्जरची किंवा वायरच्या जंजाळाची गरज नसते. ए. आर. ए. आय.ने प्रमाणित केलेले शेअर चार्जर स्टेशन इमारतींच्या आवारात उभारले जाईल.

तेथे वाहने चार्जिंगला कधी आणावीत, कोणी किती वेळ चार्जिंग केले व त्याचे बिल किती झाले ते ठरवून त्याचे पैसे देणे ही व्यवस्थादेखील अॅपमार्फत केली जाईल. हे चार्जिंग अत्यंत स्वस्त दरात होणार असल्यामुळे वाहनचालकांचे पैसेही वाचतील. तसेच यामुळे या सोयीसाठी प्रयत्न करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचा त्रासही वाचेल, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

'80 व्या वर्षी रोमांस करण्याची इच्छा ही....' म्हातारपणातील इंटिमेसीबाबत नीना गुप्ता म्हणालेल्या...'पुरुष बाहेर जाऊन...'

Simple Home Remedies: रोज रात्री जेवणानंतर पोट फुगतंय? सतत गॅसचा त्रास होतोय? आजपासून करा 'हे' सोपे उपाय

Latest Maharashtra News Updates Live: हल्ल्यामागील खऱ्या सुत्रधारांना पोलिसांनी अटक करावी - ओवेसी

SCROLL FOR NEXT