Ultra Wealthy Individuals Sakal
Personal Finance

World's Billionaires: अमेरिकेत राहतात जगातील सर्वात श्रीमंत लोक; पहा टॉप-10 देशांची यादी, भारत कोणत्या नंबरवर?

Ultra Wealthy Individuals: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने नाइट फ्रँक वेल्थ रिपोर्टचा हवाला देत, X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील अशा देशांची यादी जाहीर केली आहे जिथे अतिश्रीमंत व्यक्ती राहतात.

राहुल शेळके

Ultra Wealthy Individuals: वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने नाइट फ्रँक वेल्थ रिपोर्टचा हवाला देत, X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगातील अशा देशांची यादी जाहीर केली आहे जिथे अतिश्रीमंत व्यक्ती राहतात. ज्या लोकांची एकूण संपत्ती 3 कोटी डॉलर्स म्हणजेच सुमारे 250 कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना अतिश्रीमंतांच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आले आहे. या यादीतील टॉप 10 देशांमध्ये अमेरिका, चीन, जर्मनी, कॅनडा, फ्रान्स, यूके, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड यांचा समावेश आहे.

या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, म्हणजेच अमेरिकेत सर्वाधिक श्रीमंत लोक आहेत. अमेरिकेत 2,25,077 श्रीमंत लोक आहेत ज्यांची एकूण संपत्ती 30 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

या यादीत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे अतिश्रीमंत श्रेणीत 98,551 लोक येतात. जर्मनीमध्ये 29,021 अतिश्रीमंत लोक राहतात. त्यानंतर कॅनडा (27,928), फ्रान्स (24,941), यूके (23,072), जपान (21,710), इटली (15,952), ऑस्ट्रेलिया (15,347) आणि स्वित्झर्लंड (14,734) यांचा क्रमांक लागतो.

भारत 11व्या स्थानावर आहे

या यादीतील टॉप-10 मध्ये भारताचा समावेश नाही. या यादीत भारत 11 व्या स्थानावर आहे. भारतात 13,263 श्रीमंत लोक आहेत ज्यांची एकूण संपत्ती 3 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

श्रीमंत लोकांच्या संख्येनुसार टॉप 10 देश

  • अमेरिका: 225,077

  • चीन: 98,551

  • जर्मनी: 29,021

  • कॅनडा: 27,928

  • फ्रान्स: 24,941

  • यूके: 23,072

  • जपान: 21,710

  • इटली: 15,952

  • ऑस्ट्रेलिया: 15,347

  • स्वित्झर्लंड: 14,734

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT