Gautam Adani Sakal
Personal Finance

Gautam Adani: "सत्यमेव जयते" हिंडेनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर गौतम अदानींची पोस्ट चर्चेत

Adani-Hindenburg case: गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. निकालावर मत व्यक्त करताना त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सत्याचा विजय झाला आहे."

राहुल शेळके

Adani-Hindenburg case: गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे. निकालावर मत व्यक्त करताना त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "सत्याचा विजय झाला आहे." अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांवर न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर काही मिनिटांत त्यांनी पोस्ट केली.

पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की "माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून असे दिसून आले आहे की: सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते. जे आमच्या पाठीशी उभे राहिले त्यांचा मी ऋणी आहे. भारताच्या विकासात आमचे योगदान कायम राहील. जय हिंद,"

हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

हिंडेनबर्ग प्रकरणाबाबत मोठा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सेबीच्या तपासात कोणत्याही त्रुटी नसल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून केला जाणार नाही. (What did the Supreme Court say in the Hindenburg case?)

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, सेबीची तपासणी नियमानुसार झाली आहे. SEBI ने आतापर्यंत 22 आरोपांची चौकशी केली आहे तर 2 आरोपांची चौकशी बाकी आहे. उर्वरित प्रकरणांचा तपास तीन महिन्यांत पूर्ण करावा, असे सीजेआयने म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने 24 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता. निकाल राखून ठेवताना, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, अदानी समूहाविरुद्धच्या आरोपांची चौकशी करणार्‍या सेबीला “बदनाम” करण्याचे कोणतेही कारण नाही.

अदानी समूहावर काय आरोप होते?

हिंडेनबर्ग अहवालात गौतम अदानी आणि त्यांच्या अदानी समूहाने चुकीच्या पद्धतीने अदानी शेअर्समध्ये पैसे गुंतवल्याचा आरोप करण्यात आला होता. याद्वारे शेअरच्या किंमतीत फेरफार करून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. (What are the allegations against the Adani group?)

याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी मागणी केली होती की, अदानी कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणुकीच्या तपासासोबतच कोणाला काय फायदा झाला हेही तपासावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Gutkha Ban: आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

Aries Money Horoscope 2026: मेष राशीचं भाग्य उजळणार! करिअरमध्ये मोठी प्रगती, 4 ग्रहांच्या युतीमुळे वाढणार धनलाभ

Who is Rajan Patil : अजित पवारांचा डाव उधळणारा पठ्ठ्या! अनगरच्या रणांगणातून राजकीय ठिणगी पेटवणारे राजन पाटील कोण?

Oppo New Mobile : ओप्पोचा ब्रँड मोबाईल भारतात लॉन्च! पण Oppo Find X9 5G की OnePlus 15 5G..कोणता आहे बेस्ट? पाहा संपूर्ण Review

SCROLL FOR NEXT