Startup Layoffs Unacademy to cut 12% jobs Sakal
Personal Finance

Startup Layoffs: Unacademy मध्ये पुन्हा कर्मचारी कपात; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना दिला नारळ, कारण...

अनअकॅडमीने कर्मचारी कपातीच्या दुसर्‍या फेरीची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Unacademy Layoffs : एडटेक स्टार्टअप अनअकॅडमीने गुरुवारी कर्मचारी कपातीच्या दुसर्‍या फेरीची घोषणा केली, ज्यात त्यांच्या कर्मचार्‍यांपैकी 12% कपात केली गेली आहे.

“आम्ही आमचा मूळ व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी योग्य दिशेने प्रत्येक पाऊल उचलले आहे, तरीही ते पुरेसे नाही. अजून पुढे जायचे आहे. दुर्दैवाने, यामुळे मला आणखी एक कठीण निर्णय घ्यावा लागला. आम्ही आमच्या टीम 12% ने कमी करणार आहोत.'' असे कंपनीच्या नोटमध्ये म्हटले आहे. (Startup Layoffs Unacademy to cut 12% jobs)

कंपनीचे सह-संस्थापक गौरव मुंजाल यांनी आज सकाळी आपल्या कर्मचाऱ्यांना नोट लिहिली आणि सांगितले की खर्च कमी करण्यासाठी आणि नफा मिळविण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. असे वृत्त बिझिनेस टूडेने दिले आहे.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीने काम बंद केले होते. त्या काळात कंपनीने एकूण कर्मचाऱ्यांपैकी 10 टक्के म्हणजेच 350 लोकांना कामावरून काढून टाकले होते.

कंपनीने आश्वासन दिले होते की ते कर्मचाऱ्यांना कमी करणार नाही. त्यादरम्यान कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांचा अॅडव्हान्स पगार देण्यात आला आणि एचआरकडून नोटीस देण्यात आली.

कंपनीने जूनमध्येही काम बंद केले होते :

कंपनीने जून महिन्यात परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅननंतर 150 कर्मचाऱ्यांची कपात केली होती. याशिवाय एप्रिल महिन्यात कंत्राटी पद्धतीने कामावर घेतलेल्या 600 कर्मचाऱ्यांनाही कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला होता.

ज्यांना नुकतेच काढून टाकण्यात आले आहे त्यांना 2 महिन्यांचा आगाऊ पगार, एका वर्षासाठी वैद्यकीय विमा संरक्षण, प्लेसमेंट आणि कंपनीकडून करिअर सपोर्ट यासारख्या सुविधा दिल्या जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: सरकारी जमिनीवरील गृहनिर्माण संस्थाच्या स्वयंपुनर्विकासाला गती देणार - बावनकुळे

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचं जोरदार उत्तर! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

SCROLL FOR NEXT