JLL Report On Real Estate Sakal
Personal Finance

JLL Report: देशात न विकल्या गेलेल्या घरांच्या संख्या 24 टक्क्यांनी वाढली; तरीही किमतीत घसरण नाहीच

JLL Report On Real Estate: कोविडच्या काळात घरांच्या किमतींपासून काही काळ दिलासा मिळाला होता. घरातून काम वाढल्याने आणि बँकांकडून स्वस्त गृहकर्जाचे व्याजदर यामुळे घरांची मागणी वाढली होती. त्यामुळे फ्लॅटच्या किमती वाढू लागल्या.

राहुल शेळके

JLL Report On Real Estate: कोविडच्या काळात घरांच्या किमतींपासून काही काळ दिलासा मिळाला होता. घरातून काम वाढल्याने आणि बँकांकडून स्वस्त गृहकर्जाचे व्याजदर यामुळे घरांची मागणी वाढली होती. त्यामुळे फ्लॅटच्या किमती वाढू लागल्या. विशेष म्हणजे 2022 पासून रेपो रेट वाढल्यानंतरही घरांची मागणी कमी झालेली नाही.

गृहकर्ज ईएमआय महाग होत असूनही किमती वाढल्या असूनही मालमत्ता विक्रीवर फारसा परिणाम झालेला नाही. गेल्या काही महिन्यांतील अहवालांवर नजर टाकली तर आलिशान घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अवघ्या काही तासांत लाखो कोटी रुपयांच्या घरांचे बुकिंग होत आहे.

मोठ्या शहरांमध्ये लाखो फ्लॅट रिकामे आहेत

आता मालमत्ता आणि फ्लॅट्सबाबत धक्कादायक अहवाल समोर आला आहे. देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये फ्लॅटची विक्री न झालेल्या घरांची संख्या 2019 च्या तुलनेत 24 टक्क्यांनी वाढली आहे. या घरांची विक्री 22 महिन्यांत पूर्ण होईल, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

रिअल इस्टेट सल्लागार जेएलएल इंडियाने गुरुवारी एका अहवालात सांगितले की, मार्च 2024 पर्यंत न विकल्या गेलेल्या घरांची संख्या सुमारे 4,68,000 युनिटपर्यंत होती, जी डिसेंबर 2019 च्या तुलनेत 24 टक्क्यांनी अधिक आहे. या शहरांमध्ये दिल्ली-एनसीआर, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यासारख्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.

पूर्ण झालेल्या घरांच्या संख्येत वाढ झाली असूनही, त्यांच्या विक्रीचा अंदाजित वेळ कमी झाला आहे. जेएलएलने सांगितले की, न विकलेली घरे विकण्यासाठी लागणाऱ्या वेळेत 31 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

जानेवारी-मार्च तिमाहीत, या घरांच्या विक्रीची अंदाजे वेळ केवळ 22 महिन्यांवर आली, तर 2019 च्या अखेरीस ही वेळ 32 महिन्यांची होती. हे प्रामुख्याने घरांच्या मागणीत तीव्र वाढ झाल्यामुळे घडले आहे. तज्ज्ञांच्या मते, पूर्वी कमी मागणीमुळे घरे विकण्यासाठी जास्त वेळ लागत असे.

हे मूल्यांकन गेल्या आठ तिमाहीत नोंदलेल्या सरासरी विक्री दरावर आधारित आहे. या आकडेवारीत केवळ अपार्टमेंट फ्लॅटचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भूखंडावर बांधलेली घरे, व्हिला आणि प्लॉट डेव्हलपमेंट वगळण्यात आले आहेत.

मुंबई मार्केटमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे शहर आणि नवी मुंबईचा समावेश आहे तर दिल्ली-एनसीआरमध्ये दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद आणि सोहना येथील डेटाचा समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Pune News: नऊ वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा नगरपरिषद निवडणूक होणार

Tiruchi N. Siva: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही होणार बिनविरोध?, ‘I.N.D.I.A’ आघाडीकडून तिरुची शिवा उमेदवारीसाठी चर्चेत!

Latest Marathi News Live Updates : निफाड प्रांत कार्यालयावर पुढील आठवड्यात मोर्चा धडकणार

SCROLL FOR NEXT