UPI Transactions possible with help of voice Hello UPI facility by NPCI finance sakal
Personal Finance

UPI Payment : आता आवाजाच्या साह्याने ‘यूपीआय’वर व्यवहार शक्य; ‘एनपीसीआय’तर्फे ‘हॅलो यूपीआय’ सुविधा

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये ‘एनपीसीआय’च्या या सुविधांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आता आवाजाच्या साह्यानेही ‘यूपीआय’वरून व्यवहार करता येणार आहेत. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) संभाषणात्मक व्यवहारांची ‘हॅलो! यूपीआय’ ही अनोखी सुविधा दाखल केली आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये ‘एनपीसीआय’च्या या सुविधांची घोषणा केली. ‘एनपीसीआय’चे सल्लागार व इन्फोसिसचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष नंदन नीलेकणी आणि ‘एनपीसीआय’चे बिगर कार्यकारी अध्यक्ष बिस्वमोहन महापात्रा हे यावेळी उपस्थित होते.

‘हॅलो! यूपीआय’मुळे वापरकर्त्यांना आवाजाच्या साह्याने आदेश देत आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. सध्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये ही सुविधा उपलब्ध असून, लवकरच इतर अनेक प्रादेशिक भाषांमध्येही ती उपलब्ध होईल, असे यावेळी ‘एनपीसीआय’द्वारे सांगण्यात आले.

याव्यतिरिक्त, यूपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढण्याची सुविधाही दाखल करण्यात आली आहे. यूपीआय प्री अॅप्रुव्हड क्रेडिट जोडणी, यूपीआय टॅप आणि पे सुविधेसाठी निअर फील्ड क्यूआर कोड अशा अनेक नावीन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यावर ‘एनपीसीआय’ने भर दिला आहे.

या आधारे सर्वसमावेशक आणि शाश्वत डिजिटल व्यवहार परिसंस्था तयार करणे आणि यूपीआयद्वारे दरमहा १०० अब्ज व्यवहारांचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ‘एनपीसीआय’ने म्हटले आहे.

बँकांमध्ये ‘ई-रुपी-यूपीआय’ सुविधा

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासह सहा बँकांनी ग्राहकांसाठी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात ई-रुपीद्वारे यूपीआय पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे. यासाठी स्टेट बँकेने ई-रुपी बाय एसबीआय’ अॅप दाखल केले आहे.

या अॅपद्वारे ग्राहक आता यूपीआय क्यूआर कोड स्कॅन करून सहजपणे पेमेंट करू शकतात. स्टेट बँकेने गेल्या वर्षी डिसेंबर २०२२ मध्ये रिटेल डिजिटल ई-रुपी दाखल केला होता. स्टेट बँकेसह बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया,

एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि आयडीएफसी फर्स्ट बँक या बँकांनीही ही सुविधा उपलब्ध केली आहे. यामध्ये ग्राहक त्यांच्या ई-वॉलेटमधील ई-रुपयाद्वारे यूपीआय पेमेंट करू शकतात. यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांनाही जलद व्यवहार करता येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT