Vegetarian thali became costlier in March, non-veg cheaper Report  Sakal
Personal Finance

Veg Thali Price: मार्चमध्ये शाकाहारी थाळी झाली महाग; मांसाहारी थाळीच्या किमतीत घट, काय आहे कारण?

Vegetarian Thali Became Costlier: भारतात जेवणाची थाळी दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे की, घरी तयार केलेल्या प्रत्येक शाकाहारी थाळीची किमत मार्चमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 27.3 रुपये झाली आहे

राहुल शेळके

Veg Thali Price: भारतात जेवणाची थाळी दिवसेंदिवस महाग होत चालली आहे. रेटिंग एजन्सी क्रिसिलने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे की, घरी तयार केलेल्या प्रत्येक शाकाहारी थाळीची किमत मार्चमध्ये 7 टक्क्यांनी वाढून 27.3 रुपये झाली आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजेच मार्च 2023 मध्ये थाळीची किमत 25.5 रुपये होती.

मात्र, वाढत्या महागाईचा परिणाम शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांसाहारी लोकांवर कमी दिसत आहे. मार्च 2024 मध्ये मांसाहारी थाळीच्या किमतीत 7 टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च 2023 मध्ये त्याची किंमत प्रति प्लेट 59.2 रुपये होती, तर मार्च 2024 मध्ये ती 54.9 रुपयांपर्यंत खाली आली आहे.

शाकाहारी आणि मांसाहारी थाळीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश?

या थाळींमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ज्यामुळे त्यांची किमत ठरते. तर, अहवाल तयार करताना, क्रिसिलने शाकाहारी थाळीमध्ये रोटी, कांदा, टोमॅटो, तांदूळ, बटाटा, डाळी, दही आणि कोशिंबीर यांचा समावेश केला आहे. याचा अर्थ असा की शाकाहारी थाळीतील या सर्व गोष्टींसह एका थाळीची किंमत मार्च 2024 मध्ये 27.3 रुपये होती.

शाकाहारी थाळीमध्ये ज्या प्रकारचा समावेश होता, त्याच प्रकारचा मांसाहारी थाळीतही समावेश करण्यात आला होता. फरक एवढाच की त्यात चिकन (ब्रॉयलर) टाकण्यात आले आहे. त्यामुळे शाकाहारी थाळीच्या तुलनेत किमतही 54.9 रुपये झाली आहे.

थाळीची किमत कशी ठरवली जाते, थाळीच्या किमती का महागल्या?

घरच्या घरी बनवलेल्या थाळीची सरासरी किंमत भारताच्या सर्व भागांमध्ये म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातील सरासरी किमतींच्या आधारे मोजली जाते. क्रिसिलच्या रोटी राइस रेटच्या अहवालानुसार, कांदा, टोमॅटो आणि बटाट्याच्या किमतीत वार्षिक आधारावर अनुक्रमे 40 टक्के, 36 टक्के आणि 22 टक्क्यांनी वाढ झाल्याने शाकाहारी थाळी महाग झाली आहे.

मागील आर्थिक वर्षात (FY23) बाजारात कांदा आणि बटाट्याचा कमी पुरवठा झाल्यामुळे टोमॅटोच्या किमतीवर परिणाम झाला. कमी पुरवठामुळे तांदळाच्या किमती 14 टक्क्यांनी तर डाळींच्या किमती 22 टक्क्यांनी वाढल्या.

टोमॅटोच्या किमती 2 टक्क्यांनी घसरल्याने फेब्रुवारीच्या (रु. 27.4) तुलनेत मार्चमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत एक टक्क्याने घट झाली. मार्चमध्ये मांसाहारी थाळी वर्ष-दर-वर्ष (YoY) आधारावर स्वस्त झाली कारण चिकन ब्रॉयलरच्या किमती 16 टक्क्यांनी घसरल्या.

क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स अँड ॲनालिटिक्सचे संशोधन संचालक पुशन शर्मा म्हणाले, 'गेल्या पाच महिन्यांत शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थांच्या किमतीत तफावत आहे.'

ते म्हणाले, 'शाकाहारी थाळी वार्षिक दराने महाग झाली आहे, तर मांसाहारी थाळी स्वस्त झाली आहे. जास्त पुरवठा झाल्यामुळे ब्रॉयलर कोंबडीचे भाव घसरल्याने हा फरक झाला आहे.

भविष्यात किमत काय असेल?

फेब्रुवारीच्या तुलनेत ब्रॉयलरच्या किमतीत 5 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे मार्चमध्ये मांसाहारी थाळीच्या किमतीत 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे रमजानच्या काळात कोंबडीच्या मांसाला मागणी जास्त असते आणि चाऱ्याचे भावही वाढलेले असतात.

शर्मा म्हणाले, "बाजारात ताजे पीक आल्याने गव्हाचे भाव घसरतील आणि टोमॅटोचे भाव कमी राहतील, अशी अपेक्षा आहे, परंतु रब्बी हंगामामुळे नजीकच्या काळात कांद्याचे भाव काहीसे वाढू शकतात," शर्मा म्हणाले, भविष्यात थाळीच्या किमती वाढू शकतात, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT