Byju Trouble
Byju Trouble  sakal
Personal Finance

Byju Trouble : रवींद्रन बायजूंच्याविरुद्ध भागधारकांचे मतदान ; मतदान अवैध असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : बायजूज कंपनीच्या ६० टक्क्यांहून अधिक भागधारकांनी आज कंपनीचे संस्थापक सीईओ बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबाला हटवण्याच्या बाजूने मतदान केले. मात्र, कंपनी संस्थापकांच्या गैरहजेरीत झालेले हे मतदान अवैध असल्याचे बायजू आणि कुटुंबीयांनी म्हटले आहे.

कंपनी संस्थापकांच्या कथित गैरव्यवस्थापन आणि अपयश या कारणावरून भागधारकांनी त्यांना हटविण्याची मागणी केली आहे. कंपनीच्या सहा गुंतवणूकदारांपैकी एक गुंतवणूकदाराच्या वतीने ही आपत्कालीन सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली होती. त्यात भागधारकांनी मतदानासाठी मांडलेले सर्व ठराव एकमताने मंजूर केले.

रवींद्रन यांच्याविरोधात ‘ईडी’ने गुरुवारी सुधारित लुकआउट नोटीस जारी केली. त्यांच्यावर ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असून ‘ईडी’ या प्रकरणाचा तपास करत आहे. कंपनीवर २२०० कोटी रुपयांचा निधी परदेशातून अवैधरीत्या स्वीकारल्याचा आरोप आहे. त्याशिवाय कंपनीने बेकायदेशीरपणे ९ हजार कोटी रुपये देशाबाहेर पाठवल्याचा आरोप आहे. कंपनीने २०२१ मध्ये परदेशी बाजारातून १.२ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले होते. ते परत करण्यात अपयश आल्याने कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे.

रवींद्रन यांना कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी स्वत:ची आणि कुटुंबाची संपत्ती गहाण ठेवावी लागली असून त्यांनी आपले सर्व शेअर गहाण टाकले आहेत. परिणामी आपल्या गुंतवणुकीचे काय होणार, ही भीती कंपनीच्या गुंतवणूकदारांना सतावत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT