Infosys co-founder N Narayana Murthy's big regret Sakal
Personal Finance

Narayana Murthy: सुधा यांना कंपनीबाहेर ठेवणे ही माझी चूकच; नारायण मूर्ती यांची मुलाखतीदरम्यान कबुली

Narayana Murthy: ‘सुधा मूर्ती यांना कंपनीच्या बाहेर ठेवून मी चूक केली,’ अशी कबुली ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आज दिली. या कंपनीचे अन्य सहा संस्थापक आणि माझ्यापेक्षाही सुधा मूर्ती या अधिक पात्र होत्या; पण मी चुकीच्या आदर्शवादाला कवटाळून बसलो होतो.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: ‘सुधा मूर्ती यांना कंपनीच्या बाहेर ठेवून मी चूक केली,’ अशी कबुली ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आज दिली. या कंपनीचे अन्य सहा संस्थापक आणि माझ्यापेक्षाही सुधा मूर्ती या अधिक पात्र होत्या; पण मी चुकीच्या आदर्शवादाला कवटाळून बसलो होतो. तुम्ही स्वतःच्या उद्योगामध्ये कुटुंबीयांना सहभागी करून घेता कामा नये, असे माझे मत होते, असेही नारायण मूर्ती यांनी नमूद केले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नारायण मूर्ती म्हणाले, ‘‘स्वतःच्या कुटुंबीयांचा हस्तक्षेप टाळणे म्हणजेच एक उत्तम कॉर्पोरेट व्यवस्था असल्याचे माझे मत होते. त्या काळात अनेक उद्योगपतींची मुले कंपन्यांमध्ये येत होती; पण त्यांच्यामुळे नियमांचाही भंग होत होता.

काही वर्षांपासून मी तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांसोबत चर्चा करतो आहे, त्यांनी मात्र माझी भूमिका चुकीची असल्याचा दावा केला. अन्य व्यक्तींप्रमाणेच तुमची पत्नी, मुलगा आणि मुलीमध्येही गुणवत्ता असू शकते.

अशा स्थितीमध्ये त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणे योग्य होणार नाही. सुधा यांना कंपनीपासून दूर ठेवून मी मोठीच चूक केली, कारण त्यावेळच्या वातावरणाचा माझ्यावर मोठा प्रभाव होता.’’

सुधा याच पहिल्या गुंतवणूकदार

सध्या लेखन क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटविणाऱ्या सुधा मूर्ती यांनी नारायण मूर्ती यांना कंपनी सुरू करण्यासाठी तेव्हा दहा हजार रुपये दिले होते. ‘या दहा हजारांच्या बळावरच मी अब्जाधीश होईल,’ असा कधी विचारही केला नव्हता, असे मूर्ती यांनी स्पष्ट केले.

‘माझ्या कुटुंबासाठीच मी माघार घेतली होती, माझा मेंदू त्याला सहमत होता पण हृदय मात्र त्यासाठी तयार नव्हते. मला कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा होती,’ असे सुधा मूर्ती यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुग्णालयात ICUमध्ये अग्नितांडव, आगीच्या ज्वाळा अन् विषारी धुरात कोंडले रुग्ण; कोमातील ६ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra Weather Update: मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी,वाचा हवामान विभागाचा अंदाज

आजचे राशिभविष्य - 6 ऑक्टोबर 2025

‘सिरप’ची घातकी उबळ

Dharashiv Rain: धाराशिवच्या चार तालुक्यांत मुसळधार पाऊस; पाच दिवसांच्या खंडानंतर पुन्हा जोरदार तडाखा

SCROLL FOR NEXT