Gold Investment Sakal
Personal Finance

Gold Investment: जगात सर्वाधिक सोने कोण खरेदी करत आहे आणि का? जाणून घ्या

गुंतवणूकदार सोन्यात सर्वात मोठी गुंतवणूक का करतात?

राहुल शेळके

Gold Investment: जगात सर्वात जास्त सोने कोण खरेदी करते हे तुम्हाला माहीत आहे का? आतापर्यंत सोन्याच्या खाणीतून बाहेर पडलेल्या सोन्यापैकी एक पंचमांश हे केंद्रीय बँकांकडे आहे.

गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांव्यतिरिक्त जगभरातील देशांच्या मध्यवर्ती बँका सोन्याची मागणी करत आहेत. (Who is buying the most gold in the world and why? know the reason)

2022 मध्ये मध्यवर्ती बँकांनी 1967 नंतर सर्वाधिक सोने खरेदी केले आहे. 2022 ची विक्रमी सोने खरेदी 1990 आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीच्या तुलनेत अगदी विरुद्ध आहे. त्यावेळी मध्यवर्ती बँका सोन्याच्या निव्वळ विक्रेत्या होत्या.

सर्वप्रथम, तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की केंद्रीय बँका सोने का खरेदी करतात? मध्यवर्ती बँकांकडे सोने ठेवण्याची तीन कारणे आहेत.

एक: परकीय चलनाचा साठा संतुलित करणे

आर्थिक संकटाच्या काळात स्थिरता वाढवण्यासाठी मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या साठ्याचा एक भाग म्हणून सोने साठवून ठेवले आहे.

दोन: परकीय चलनांविरूद्ध बचावासाठी

महागाईमुळे चलनांच्या (प्रामुख्याने यूएस डॉलर) घटणाऱ्या क्रयशक्तीविरुद्ध सोने अर्थव्यवस्थेत स्थिरता आणते.

तीन: पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे

सोन्याचा अमेरिकन डॉलरशी उलटा संबंध आहे. जेव्हा डॉलरचे मूल्य घसरते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. सोने मध्यवर्ती बँकांना अस्थिरतेपासून दूर ठेवते.

1990 आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात मध्यवर्ती बँका सोन्याच्या निव्वळ विक्रेत्या होत्या. विक्रीच्या मागे अनेक कारणे होती, ज्यात चांगली आर्थिक परिस्थिती आणि सोन्याच्या किंमतीतील घसरण यांचा समावेश होता.

या कालावधीत 395 टन सोने खरेदी करून भारत चौथ्या क्रमांकावर राहिला. 1997 च्या आशियाई आर्थिक संकटानंतर आणि नंतर 2007-08 च्या आर्थिक संकटानंतर मध्यवर्ती बँकेचा सोन्याबद्दलचा दृष्टिकोन बदलू लागला. 2010 पासून, मध्यवर्ती बँका वार्षिक आधारावर सोन्याचे निव्वळ खरेदीदार आहेत.

IMF च्या आकडेवारीनुसार, रशिया आणि चीन हे गेल्या दोन दशकांत सोन्याचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. या यादीतील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे बहुतेक देश उदयोन्मुख अर्थव्यवस्था आहेत.

हे देश चलनांवर, प्रामुख्याने यूएस डॉलरवर परिणाम करणाऱ्या आर्थिक आणि भू-राजकीय जोखमींपासून बचाव करण्यासाठी सोने साठवत आहेत.

दुसरीकडे, स्वित्झर्लंड, फ्रान्स, नेदरलँड्स आणि यूकेसह युरोपीय देश हे या कालावधीत सेंट्रल बँक गोल्ड अॅग्रीमेंट फ्रेमवर्क अंतर्गत 1999 ते 2021 दरम्यान सोन्याची सर्वाधिक विक्री करणारे होते.

ऑक्‍टोबर 2022 पर्यंत तुर्कस्तान हा सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार होता, आणि त्याच्या साठ्यात 148 टनांची भर पडली.

अमेरिकेसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान चीनने नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात 62 टन सोन्याची खरेदी सुरू ठेवली. भारताने 33 टन सोने खरेदी केले, जे या कालावधीत केंद्रीय बँकांकडून खरेदी केलेल्या एकूण सोन्याच्या केवळ 3% आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT