Who is Vaibhav Taneja Elon musk new party esakal
Personal Finance

Vaibhav Taneja : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चा खजिनदार भारतीय वंशाचा; कोण आहे सीएफओ वैभव तनेजा?

Who is Vaibhav Taneja Elon musk new party : इलॉन मस्कच्या नव्या 'अमेरिका पार्टी'चे खजिनदार बनले टेस्लाचे भारतीय वंशाचे सीएफओ वैभव तनेजा!

Saisimran Ghashi
  • इलॉन मस्कने 'अमेरिका पार्टी' नावाचा नवीन राजकीय पक्ष जाहीर केला.

  • टेस्लाचे CFO वैभव तनेजा या पक्षाचे खजिनदार म्हणून नियुक्त झाले.

  • वैभव तनेजा यांनी 2024 मध्ये 139 दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.

Elon Musk America Party : अमेरिकेतील राजकारणात एक मोठा बदल घडत आहे. टेस्ला कंपनीचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) वैभव तनेजा यांची इलॉन मस्कच्या नव्याने स्थापन झालेल्या ‘अमेरिका पार्टी’ चे खजिनदार (Treasurer) आणि दस्तऐवजांचे प्रमुख (Custodian of Records) म्हणून नियुक्ती झाली आहे. ही माहिती फेडरल इलेक्शन कमिशन (FEC) च्या एका अधिकृत कागदपत्रात नमूद करण्यात आली असून, ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.

इलॉन मस्कने रविवारी एक मोठी घोषणा करत ‘The America Party’ स्थापन केल्याचे जाहीर केले. त्याने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, "आज अमेरिका पार्टी स्थापन केली आहे, जी तुमचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवून देईल."

या नव्या पक्षाच्या स्थापनेमागे मस्कचा उद्देश आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या “बिग, ब्यूटीफुल” टॅक्स बिलला आव्हान देणे. मस्कच्या मते, “2:1 च्या प्रमाणात लोक नव्या पक्षाची मागणी करत आहेत आणि ती आता पूर्ण होणार आहे.”

वैभव तनेजा हे मूळचे भारतीय असून 2023 मध्ये ते टेस्लाचे CFO झाले. त्यांनी 2017 मध्ये SolarCity या कंपनीच्या अधिग्रहणानंतर टेस्लामध्ये प्रवेश केला. तिथून त्यांनी सहायक कॉर्पोरेट कंट्रोलरपासून सुरुवात करून, कॉर्पोरेट कंट्रोलर, चीफ अकाउंटिंग ऑफिसर अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडत शेवटी CFO पदापर्यंत मजल मारली. त्यांच्या आर्थिक कौशल्यामुळेच मस्कने त्यांच्यावर पक्षाच्या आर्थिक जबाबदाऱ्यांसाठी विश्वास ठेवला आहे.

तनेजा अलीकडेच आणखी एका कारणाने चर्चेत आले 2024 मध्ये त्यांनी 139 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1150 कोटी रुपये) इतकी कमाई केली. ही कमाई मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला किंवा गुगलचे सुंदर पिचाई यांच्याही पगाराच्या तुलनेत अधिक आहे.

भारतीय वंशाचे वैभव तनेजा आता केवळ जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात नव्हे, तर अमेरिकेच्या राजकारणातही महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. इलॉन मस्कसारख्या प्रभावशाली उद्योजकाच्या नव्या राजकीय पक्षात अशी मोठी जबाबदारी मिळणे हे भारतासाठी अभिमानास्पद आहे.

'अमेरिका पार्टी'चा पुढचा राजकीय प्रवास कसा असेल आणि वैभव तनेजा यांची भूमिका कशी ठरेल, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे

FAQs

  1. इलॉन मस्कने कोणता नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे?
    A. The America Party.

  2. वैभव तनेजा कोण आहेत?
    A. ते टेस्ला कंपनीचे CFO (मुख्य आर्थिक अधिकारी) आहेत.

  3. वैभव तनेजा यांची अमेरिका पार्टीमध्ये काय भूमिका आहे?
    A. ते खजिनदार व कागदपत्रांचे प्रमुख आहेत.

  4. वैभव तनेजा यांनी 2024 मध्ये किती कमाई केली?
    A. सुमारे $139 दशलक्ष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

SCROLL FOR NEXT