Wholesale price inflation declines to 0.27 per cent in January  Sakal
Personal Finance

WPI Inflation: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घाऊक महागाई दर 0.27 टक्क्यांवर; काय आहे कारण?

WPI Inflation: सरकारने जानेवारी महिन्यासाठी घाऊक महागाई दर (WPI महागाई) जाहीर केला आहे. किरकोळ महागाई दर काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. यावेळी जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दर 0.27 टक्के होता. तर डिसेंबरमध्ये घाऊक महागाई दर 0.74 टक्के होता.

राहुल शेळके

WPI Inflation: सरकारने जानेवारी महिन्यासाठी घाऊक महागाई दर (WPI महागाई) जाहीर केला आहे. किरकोळ महागाई दर काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. यावेळी जानेवारी महिन्यात घाऊक महागाई दर 0.27 टक्के होता. तर डिसेंबरमध्ये घाऊक महागाई दर 0.74 टक्के होता. जानेवारीमध्ये किरकोळ महागाई आणि घाऊक महागाई या दोन्हींमध्ये घसरण झाली आहे. (Wholesale price inflation declines to 0.27 per cent in January)

जानेवारीत दैनंदिन वस्तूंच्या महागाईचा दरही कमी झाला आहे. डिसेंबरमध्ये हा दर 5.78 टक्के होता तो जानेवारीत 3.84 टक्क्यांवर आला. त्याचबरोबर वीज आणि इंधनाच्या महागाईचा दरही जानेवारीत नकारात्मक राहिला आहे. डिसेंबरमध्ये महागाई -2.41 टक्के होती, तर जानेवारीमध्ये -0.51 टक्के होती. (India’s wholesale price inflation decreased in January)

किरकोळ महागाईतही घसरण

यापूर्वी 12 फेब्रुवारीला किरकोळ महागाई दराचे आकडेही आले होते. किरकोळ महागाईचा दर जानेवारीत 5.1 टक्क्यांवर आला होता. आणि गेल्या तीन महिन्यांतील ही नीचांकी पातळी होती. डिसेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 5.69 टक्के होता. तर नोव्हेंबरमध्ये महागाई दर 5.55 टक्के होता. तर ऑक्टोबर 2023 मध्ये तो सर्वात कमी 4.87 टक्के होता.

घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय?

घाऊक किंमत निर्देशांक हा (WPI) मोठ्या प्रमाणात विकल्या गेलेल्या आणि व्यापार केलेल्या वस्तूंच्या किंमतीतील बदलांचे मूल्यांकन करतो. अर्थव्यवस्थांमध्ये महागाई दर मोजण्यासाठी घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय)चा वापर केला जातो. घाऊक किंमत निर्देशांकामध्ये फक्त वस्तूंचा समावेश करण्यात येतो. त्यामध्ये सेवांचा समावेश नसतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT