Rs. 1000 notes Esakal
Personal Finance

RBI: 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात येणार का? RBIनं केलं स्पष्ट

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतल्यानंतर पुन्हा 1000 रुपयांची नोट चलनात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण खरंच रिझर्व्ह बँक ही नोट पुन्हा आणण्याचा विचार करत आहे का? याबाबत स्वतः बँकेच्या सुत्रांनी स्पष्ट केलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Will 1000 rupee note be in circulation again RBI made it clear)

प्रस्तावाबाबत स्पष्टीकरण

या वर्षाच्या सुरुवातीला आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं होतं की, 2000 रुपयांची नोट चलनातून काढून घेतल्यानंतर आता 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात येणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण अशा प्रकारे 1000 रुपयांची नोट पुन्हा आणण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. (Latest Marathi News)

प्राथमिकदृष्ट्या 2000 ची नोट चलनात

गव्हर्नर यावेळी असंही म्हणाले होते, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या करन्सीच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी प्राथमिकदृष्ट्या 2000 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. पण नंतर चलनात इतर नोटा बऱ्यापैकी आल्यानंतर २०१८-१९ मध्ये 2000 रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्यात आली होती. (Marathi Tajya Batmya)

आरबीआय कार्यालयात नोटा बदलून मिळणार

यानंतर आरबीआयनं एक परिपत्रक जाहीर करत ३० सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करण्याचा अखेरची मुदत दिली होती. नंतर ७ ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली. यानंतर ८ ऑक्टोबरपासून ज्यांना नोट बदलायची आहे. त्यांना आरबीआयच्या १९ कार्यालयांमधून त्याबदल्यात पैसे अकाऊंटला जमा करण्यात येतील असं सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT