2000 note 
Personal Finance

Withdrawal Rs 2000 note: सरकारला पुन्हा 1000ची नोट आणावी लागणार! मुणगेकरांनी केलं भाकीत

2,000 रुपयांची नोट वितरणातून काढून घेतल्यानंतर आता पुढे काय असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : देशाची मध्यवर्ती बँक अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) काल मोठी घोषणा करत वितरणातून 2,000 रुपयांची नोट मागे घेण्याची घोषणा केली. आरबीआयच्या या निर्णयानंतर आता पुढे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण यांपैकी एक शक्यता अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केली आहे. (Withdrawal of Rs 2000 note govt will have to bring 1000 note again predicted Bhalchandra Mungekar)

मुणगेकर यांनी म्हटलं की, "खरंतर सरकारनं आणि पंतप्रधानांनी या निर्णयासाठी देशाची माफी मागायला पाहिजे होती. पण माफी मागण्याऐवजी घेतलेला चुकीचा निर्णय दुरुस्त करण्यासाठी आता बरोबर उलटा निर्णय सरकारला घ्यावा लागतो ही सरकारची नामुष्की आहे. अशा नामुष्कीमध्ये आरबीआयनं कधीही सामिल होता कामा नये. आरबीआयनं दुध का दूध-पानी का पानी अशा स्वरुपचा स्वायत्त निर्णय घेणं अपेक्षित होतं. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या कायद्यानुसार स्वायत्त आहे.

1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणावी लागेल

2000 रुपयांची नोट मागे घेतल्यानंतर अर्थव्यवस्थेचा सर्व भार आता केवळ 500 रुपयांच्या नोटांवर पडेल. याचा साधा अर्थ असा की 500 रुपयाच्या नोटा हेच फक्त चलन भारतासारख्या एवढ्या मोठ्या देशात चालणार नाही. त्यामुळं आरबीआयला त्वरीत 1000 रुपयांची नोट पुन्हा चलनात आणावी लागेल. हे मी तुम्हाला आजच सांगतो आहे. जो निर्णय ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतला होता. तो दिवाळखोरपणाचा निर्णय होता, तो सिद्ध झाल्यानं आता सरकारला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणाव्या लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT