You can make payment even if there is no money in the account, how to use UPI Now, Pay Later Sakal
Personal Finance

खात्यात पैसे नसले तरी करू शकता पेमेंट, UPI Now, Pay Later चा असा करा वापर

UPI Now, Pay Later: तुम्ही UPI द्वारे क्रेडिटवर पैसे खर्च करू शकता.

राहुल शेळके

UPI Now, Pay Later: तुमच्या खात्यात पैसे नसले तरी तुम्ही UPI द्वारे पेमेंट करू शकता हे तुम्हाला माहीत आहे का? खरं तर, 4 सप्टेंबर रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकांना त्यांच्या UPI वापरकर्त्यांना क्रेडिट लाइन सुविधा देण्याची परवानगी दिली आहे. म्हणजेच, तुम्ही UPI द्वारे क्रेडिटवर पैसे खर्च करू शकता.

वापरकर्त्यांसाठी UPI मध्ये काय बदल होईल?

आत्तापर्यंत, ग्राहक फक्त त्यांचे बचत खाते, ओव्हरड्राफ्ट खाते, प्रीपेड वॉलेट आणि क्रेडिट कार्ड UPI प्रणालीशी लिंक करू शकत होते. पण आता तुम्ही तुमच्या क्रेडिट लाइनचा वापर करून UPI ​​व्यवहार देखील करू शकता.

क्रेडिट लाइन म्हणजे काय?

ही एक प्रकारची ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे जी बँका त्यांच्या UPI वापरकर्त्यांना देत आहेत. ही सुविधा Google Pay, Paytm, Mobiqui किंवा इतर कोणत्याही UPI अॅपवर वापरली जाऊ शकते.

ही सुविधा चालू करण्यासाठी प्रथम बँकेची परवानगी घ्यावी लागेल. ही क्रेडिट लाइन मंजूर झाल्यावर तुम्ही UPI ​​द्वारे वापरू शकाल. यामध्ये, काही बँका क्रेडिट लाइनच्या वापरलेल्या मर्यादेवर शुल्क आकारतात.

ज्याप्रमाणे तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल देय तारखेला भरता, त्याचप्रमाणे तुम्हाला UPI क्रेडिट लाइनचे बिल देय तारखेपर्यंत भरावे लागते.

जर तुम्हाला UPI Now Pay Later ही सुविधा वापरायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला यासाठी तुमच्या बँकेशी बोलावे लागेल. बँकेच्या वेबसाइट किंवा अॅपवर देखील ही माहिती तपासू शकता.

बर्‍याच बँकांनी ते आधीच सुरू केले आहे आणि तुमच्या परवानगीनंतर, तुमची क्रेडिट लाइन चालू केली जाईल. काही बँकांमध्ये, तुम्हाला ते चालू करण्यासाठी शुल्क भरावे लागेल, जसे की HDFC बँक यासाठी सुमारे 150 रुपये आकारते.

या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे

  • HDFC बँक आणि ICICI बँक UPI Now Pay Later सुविधेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतची क्रेडिट लाइन ऑफर करत आहेत. तुम्हाला मिळणाऱ्या क्रेडिट लाइनची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असेल.

  • सध्या, तुम्ही ही सुविधा वापरून फक्त व्यापाऱ्यांना UPI पेमेंट करू शकता. तुम्ही ही सुविधा वापरून कोणालाही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही.

  • वेगवेगळ्या बँका ही सुविधा सक्रिय करण्यासाठी, ती वापरण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT