YouTube Cuts 100 Employees as Tech Layoffs Continue  Sakal
Personal Finance

Tech Layoffs: यूट्यूबचा मोठा निर्णय; 'इतक्या' कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Tech Layoffs: Google च्या मालकीची कंपनी YouTubeने व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स टीममधून किमान 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहे. YouTube चीफ बिझनेस ऑफिसर मेरी एलेन को यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

राहुल शेळके

Tech Layoffs: Googleच्या मालकीची कंपनी YouTubeने व्यवस्थापन आणि ऑपरेशन्स टीममधून किमान 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. YouTube चीफ बिझनेस ऑफिसर मेरी एलेन को यांनी कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे.

मेरी एलेन को यांनी संस्थेतील कर्मचार्‍यांना लिहिले की, “आम्ही काही नोकऱ्या कमी करण्याचा आणि काही सहकाऱ्यांना निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे.'' NYTच्या वृत्तानुसार 100 प्रभावित कर्मचार्‍यांना YouTubeमध्ये इतर पदांसाठी अर्ज करण्याची संधी असणार आहे.

पिचाई यांनी बुधवारी सर्व Google कर्मचार्‍यांना पाठवलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे की, आमच्यासमोर महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे आहेत. आम्ही या वर्षी आमच्या प्राधान्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. पिचाई यांनी मेमोमध्ये स्पष्टपणे सांगितले की, येत्या काही दिवसांत ज्या कठोर निर्णयाबद्दल बोलले जात आहे तो प्रत्यक्षात कर्मचारी कपातीशी संबंधित आहे.

गुगलच्या सीईओ पिचाई यांनी आश्वासन दिले की, ''आगामी कर्मचारी कपात गेल्या वर्षीइतकी मोठी असणार नाही आणि प्रत्येक टीमवर त्याचा परिणाम होणार नाही. परंतु मला माहित आहे की तुमचे सहकारी आणि टीमला कर्मचारी कपातीमुळे प्रभावित झालेले पाहणे कठीण आहे.''

गेल्या वर्षी 12 हजार कर्मचार्‍यांना काढून टाकले

गुगलने गेल्या वर्षी सुमारे 12 हजार कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते. त्या कपातीमध्ये हार्डवेअर, जाहिरात, खरेदी, धोरण, अभियांत्रिकी आणि YouTube यासह सर्व टीमचे कर्मचारी प्रभावित झाले होते.

यावेळी YouTube कर्मचार्‍यांना याचा सर्वात आधी फटका बसणार आहे. व्हिडिओ प्लॅटफॉर्मवरील सुमारे 100 कर्मचार्‍यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT