Astra Microwave Products share sakal
Share Market

Astra Microwave Products share : 4 वर्षात 1 लाखाचे झाले 11 लाख ; आता कंपनीला मिळाली 385 कोटींची ऑर्डर, शेअर्समध्ये तेजीचे संकेत

ऍस्ट्रा मायक्रोव्हेव प्रोडक्ट्सला (Astra Microwave Products) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) , गाझियाबादकडून 385.58 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. मीडियम पॉवर रडार सब-सिस्टम्स सप्लाय करण्यासाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

ऍस्ट्रा मायक्रोव्हेव प्रोडक्ट्सला (Astra Microwave Products) भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) , गाझियाबादकडून 385.58 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. मीडियम पॉवर रडार सब-सिस्टम्स सप्लाय करण्यासाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे. ही ऑर्डर पूर्ण होण्यासाठी अंदाजे 36 महिने लागतील. ऍस्ट्रा मायक्रोव्हेव प्रोडक्ट्सने 28 मार्चला शेअर बाजारांना याची माहिती दिली, त्यानंतर कंपनीचे शेअर्स 9 टक्क्यांहून अधिक वाढले. सध्या बीएसईवर या शेअरची किंमत 595.70 रुपये आहे.

ऍस्ट्रा मायक्रोव्हेव प्रोडक्ट्सच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात 174 टक्के परतावा दिला आहे. बीएसईवर 28 मार्च 2023 रोजी शेअरची किंमत 217.2 रुपये होती. जर एखाद्याने वर्षभरापूर्वी या शेअर्समध्ये 50,000 रुपये गुंतवले असते तर आज ही रक्कम एका वर्षात दुप्पट होऊन 1.37 लाख झाली असती.

चार वर्षांपूर्वी, ऍस्ट्रा मायक्रोव्हेव प्रोडक्ट्सच्या शेअरची किंमत बीएसईवर फक्त 52 रुपये होती. जर एखाद्याने या किंमतीत शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्यांची गुंतवणूक 11.45 लाखावर गेली असती. 9 मे 2024 रोजी शेअरने 690 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. तर 29 मे 2023 रोजी 217.85 रुपयांचा 52 आठवड्यांचा नीचांक दिसला.

कंपनीचे मार्केट कॅप 5600 कोटी आहे. ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय डायरेक्टने ऍस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रोडक्ट्सच्या स्टॉकला 'बाय' रेटिंग दिले आहे. तसेच टारगेट 740 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली आहे. 28 मार्चला बीएसईवरील स्टॉकच्या बंद किंमतीपेक्षा ही किंमत 24 टक्के अधिक आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

MLA Gopichand Padalkar: 'जयंत पाटील यांच्याविषयी एकही शब्द बोलणार नाही': आमदार गोपीचंद पडळकर; घायवळचे अनेक साथीदार रोहित पवारांचे मित्र

Solapur News:'जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाची गरज‌'; जिल्हाधिकाऱ्यांकडून माढा तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

Sinai River: 'कोळेगाव-आष्टे बंधाऱ्याची झाली दुर्दशा'; सीना नदीचा पूर ओसरल्यानंतरही पुलावरील वाहतूक अद्याप बंद

SCROLL FOR NEXT